Reliance Jio Sri Lanka Deal : मुकेश अंबानी हे आपल्या देशातील प्रसिद्ध आणि जाणकार उद्योगपती आहेत. रिलायन्स कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक उप-कंपन्यांद्वारे ते दिवसेंदिवस व्यवसाय विस्तार करण्याचा प्रयत्न करीत असतात. मुकेश अंबानी या यशस्वी उद्योजकाने आज संपूर्ण आशिया खंडात सर्वात श्रीमंत माणूस म्हणून आपले नाव नोंदवले आहे. त्यांची गुंतवणूक केवळ देशभरातच नाही तर विदेशात देखील पसरलेली पाहायला मिळते. ताज्या बातमी नुसार सध्या मुकेश अंबानी हे श्रीलंकेतील एक Telecom कंपनी विकत घेण्याच्या मार्गावर आहेत. PLC ही श्रीलंकेतील कंपनी विकत घेण्यासाठी सध्या जगभरातील तीन कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला गोर्ट्यून इंटरनेशनल इन्वेस्टमेंट होल्डिंग(Gortune International Investment Holding Ltd) आणि पेटीगो कॉमर्सियो इंटरनेशनल(Pettigo Comercio International) यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.
मुकेश अंबानी विकत घेणार श्रीलंकेतील कंपनी: (Reliance Jio Sri Lanka Deal)
सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक संकटांचा सामना करणारा देश म्हणजेच श्रीलंका अधिकाधिक पैसे जमा करण्यासाठी देशातील सरकारी मालकीच्या काही मोठाल्या कंपन्यांचा सौदा करीत आहे. PCL Telecom कंपनी ही सुद्धा श्रीलंका सरकारच्या अंतर्गत येत असून 10 नोव्हेंबर 2023 रोजी श्रीलंका सरकारने ही कंपनी विकत घेण्यासाठी विदेशातून अनेक उद्योजकांना आमंत्रित केले होते. आता 12 जानेवारी 2024 रोजी या सौद्याची अंतिम तारीख संपलेली असून श्रीलंका सरकार कराराबद्दल पुढील माहिती जाहीर करणार आहे.
PCL कंपनीची श्रीलंका सरकारकडे 49.5 टक्के भागीदारी आहे, तर बाकी 44.9 टक्क्यांची भागीदारी मधील ऍमस्टरडॅम मधल्या ग्लोबल टेलिकामुनिकेशन्स होल्डिंग यांच्याकडे आहे. श्रीलंका सरकारने केवळ त्यांच्या हिस्सेदारीतील भाग विक्रीसाठी उतरवला असून त्याच्या खरेदीसाठी रिलायन्स जिओ तसेच बाकी दोन दिग्गज कंपन्यांनी उत्साह दाखवला आहे.
रिलायन्स जिओचे एकूण Valuation किती?
बोफा(Bofa) ही एक मान्यताप्राप्त ब्रोकरेज फॉर्म आहे. यांच्याकडून रिलायन्स जिओ या कंपनीचे एकूण व्हॅल्युएशन 107 अब्ज डॉलर्स असल्याची माहिती सादर करण्यात आली. बोफाच्या म्हणण्यानुसार सध्या रिलायन्स जिओ ही जिओ भारत(JioBharat) आणि जिओ एअर फाइबर(JioAirFiber) यांच्या मदतीने अधिकाधिक ग्राहक जोडण्याच्या मार्गावर आहे.
संपूर्ण रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे देखील 100 अब्ज डॉलर्स संपत्ती असलेल्या जागतिक समूहामध्ये सामील झाले आहेत. रिलायन्स कंपनीच्या उपकंपन्या उत्तम कामगिरी बजावत असल्यामुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती 103 अरब डॉलर्सच्या घरात जाऊन पोहोचली असल्याने आत्ताच्या घडीला मुकेश अंबानी हे जगभरातील बारावे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.