Reliance Market Cap: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या नावावर आणखी एका मोठ्या यशस्वी टप्प्याची नोंद झाला आहे. आज त्यांच्या जगप्रसिद्ध कंपनीने म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजने इतिहास घडवून दाखवलाय. रिलायन्सची बाजारपेठ भांडवली (RIL MCap) 20 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आणि ही रक्कम गाठणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे. हा क्षण केवळ कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय उद्योग जग आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठीही आनंदाचा सोहळा ठरला. रिलायन्सच्या या यशामध्ये अंबानी यांचे धाडसी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी दिसून येते, त्यांनी अनेक क्षेत्रांत गुंतवणूक करून कंपनीचे विविधीकरण केले, त्यामुळेच कंपनीला ही उंची गाठता आली.
शेअर बाजार खुल्ता होताच रिलायन्सचा धमाका: (Reliance Market Cap)
आज सकाळी शेअर बाजाराच्या सुरुवातीला 2911 रुपयांवर झळकलेल्या कंपनीच्या शेअर्सनी 2908 ते 2958 रुपयांची झेप घेतली. वाढीचा हा वेग कायमच होता, मात्र काही काळात 2 टक्क्यांनी वधारल्यानंतर अचानक यात काही घसरण झाली आणि शेअरची किंमत 1.89 रुपयांवर स्थिरावली. पण ही घसरण फार काळ टिकली नाही आणि शेअर पुन्हा वधारून 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 2957 रुपयांवर जाऊन पोहोचले.
गेल्या काही दिवसांत रिलायन्सच्या शेअर्समध्ये सतत झालेली वाढ ही खास गोष्ट आहे. या वाढीमुळे कंपनीचे बाजार मूल्यही झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यांतच हे मूल्य जवळजवळ 1 लाख कोटी रुपयांनी वाढले. यावरून गुंतवणूकदारांचा रिलायन्सवर असलेला विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा स्पष्ट दिसतात.
रिलायन्सचा व्यवसाय कोणता?
मुकेश अंबानींची रिलायन्स कंपनी तेल ते दूरसंचार क्षेत्रापर्यंत अनेक उद्योगांमध्ये कार्यरत असून सतत वाढत राहिली आहे. त्यामुळे या कंपनीची किंमतही वाढतच चाललीये(Reliance Market Cap). याच प्रवासात आता 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचणारी रिलायन्स ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे.