Reliance SBI Card : तुम्ही क्रेडीट किवा डेबिट कार्डचे वापरकर्ते आहात का? हो तर हि बातमी तुमच्यासाठी खास आहे. रिलायन्सने आपल्या ग्राहकांसाठी SBI बँकेसोबत हातमिळवणी करत आपले नवं कार्ड बाजारात आणले आहे. यासंदर्भात Reliance आणि SBI Card मध्ये करार झाला असून या करारामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
अनेक क्षेत्रांमध्ये यश संपादन केल्यानंतर आता रिलायंस कंपनीने बँकिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. रिलायंस रिटेल हि उपकंपनी आणि SBI कार्ड यांच्यात एक करार झालेला आहे. या करारामुळेच आपल्यालाला लवकरच रिलायंस कंपनीचे कार्ड बाजारात पाहायला मिळेल. हे कार्ड दोन व्हरायटीजमध्ये बाजारात आणण्यात आलं आहे, Reliance SBI Card आणि Reliance SBI Card Prime अशी २ नावं या कार्ड ला देण्यात आली आहेत. हे कार्ड Rupayचा वापर करून रिसायकल्ड प्लॅस्टिकच्या माध्यमातून बनवण्यात आलं आहे. अस म्हटलं जातंय कि या कार्डमुळे ग्राहकांना भरपूर फायदा होणार आहे.
या कार्डचे फायदे काय: Reliance SBI Card
कंपनीकडून(Reliance Retail) बाजारात आणलेल्या या कार्ड मधून तुम्ही एक ठराविक रक्कम खरच करू शकता. जर का तुम्ही Reliance SBI Card विकत घेणार असाल तर यावर तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची सवलत दिली जाईल आणि हेच जर क अतुम्ही Prime कार्ड धाकर बनू इच्छित असाल तर 3 लाख रुपयांपर्यंत खरेदी केली जाऊ शकते. सध्या कार्डवर 499 रुपयांची रक्कम भरावी लागेल तर Prime कार्ड धारकांना 2999 एवढी रक्कम वार्षिक कर म्हणून द्यावी लागेल.