Reserve Bank Of India : आपण गरजेच्यावेळी बँक किंवा आर्थिक संस्थांकडून कर्ज घेत असतो आणि त्या कर्जाची परतफेड करवून घेण्यासाठी आपल्याला काही रिकव्हरी एजंट पुन्हा फोन करतात. मात्र आता रिझर्व बँकेने आपल्या ग्राहकांच्या दृष्टीने विचार करत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. कुठलाही रिकवरी एजंट तुम्हाला संध्याकाळी 7 नंतर लोनच्याबाबत बोलण्यासाठी फोन करू शकत नाही. रिझर्व बँक (Reserve Bank Of India) ही आपल्या देशात बँकिंगच्या सर्वात महत्त्वाचे निर्णय घेत असते आणि या बँक कडून घेतले गेलेले सर्व निर्णय हे प्रत्येकाला मान्य करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आता रिकवरी एजंट यांच्या सतत फोन करण्यावर आळा बसणार आहे.
रीकवरी एजंट वर बसवला रिझर्व बँकेने आळा: Reserve Bank Of India
आपण जे काही कर्ज घेतो त्याची परतफेड करण्याची आठवण सातत्याने करून देण्यासाठी रिकवरी एजंट आपल्याला फोन करत असतात. पण वेळेचे पालन न करत आपल्या ग्राहकाच्या खाजगी वेळेत डोकावून त्यांना त्रास प्रकरण हे चुकीचा आहे. आपल्या ग्राहकांची हीच गरज ओळखून रिझर्व बँकेने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लोन रिकव्हरी करणाऱ्या एजंट्सना सकाळी आठ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी सात वाजल्यानंतर आपल्या कोणत्याही ग्राहकाला संपर्क करता येणार नाही.
अजून काय म्हणाली रिझर्व बँक:
रिझर्व बँक कडून (Reserve Bank Of India) जोखीम व्यवस्थापन आणि वित्तक्षेत्रातील कामांचे आउटसोर्सिंग याबद्दल एक आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. तत्वांचे पुरेपूर पालन करणे प्रत्येक बँक किंवा आर्थिक संस्थेसाठी अनिवार्य आहे. रिझर्व बॅंकेच्या म्हणण्याप्रमाणे बँक किंवा वित्तीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी ग्राहकांसोबत कोणताही असंवेदनशील व्यवहार करू नये, आपला ग्राहक वर्ग दुखावला जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. लोन विषयी जेव्हा ग्राहकाशी संपर्क साधला जातो तेव्हा आपण किती प्रमाणात त्याची खाजगी माहिती जाणून घ्यावी, त्याच्याशी कोणत्या भाषेत बोलावे, भाषेचे तारतम्य कसे बाळगावे याविषयी प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे(RBI’s New Decision).
ज्या कर्जाची परतफेड अजूनही झालेली नाही त्याविषयी बोलताना असंवेदनशील भाषेचा वापर प्रतिनिधींनी करू नये, आपल्या भाषेतून ग्राहकाचा मानसिक छळ किंवा अपमान होणार नाही याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे. कर्ज घेणाऱ्या माणसासोबतच हामीदार असणाऱ्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारची अपमानास्पद वागणूक करू नये, महत्त्वाचा म्हणजे वसुली करणाऱ्या प्रतिनिधींनी आपल्या ग्राहकांना सकाळी आठ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी सात वाजल्यानंतर फोन करण्यास सक्त मनाई घालण्यात आली आहे.