Resume Tips : नोकरीसाठी Apply करताना अशाप्रकारे बनवा तुमचा Resume; पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल

बिझनेसनामा ऑनलाईन । जेव्हा तुम्ही शिक्षण घेऊन (Resume Tips) नोकरीसाठी प्रयत्न करता, तेव्हा सर्वप्रथम तुमचा Resume बघितला जातो. तुमच्यामध्ये काय गुण आहेत आणि तुम्ही काय काय करू शकता हे तुमच्या Resume वरून समजते. त्यामुळे Resume सुटसुटीत आणि व्यवस्थित असावा. इंटरव्यू मध्ये सिलेक्ट होण्यासाठी देखील सर्वात पहिले तुम्ही तयार केलेला रिझ्युम यावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे आपला Resume आकर्षक आणि छाप पाडणारा असावा. त्यासाठी त्यामध्ये काय काय बदल करायला हवेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स- Contact Details

रिझ्युम वर (Resume Tips) तुमचा छाप पाडणारा फोटो लावल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्सकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. माहितीच्या माध्यमातून रिझ्युम योग्य लेयर मध्ये दिसावा, म्हणूनच तुम्हाला तुमची पर्सनल माहिती आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहावे लागतील. त्याचबरोबर तुमचे नाव लिहिताना पहिलं अक्षर कॅपिटल आणि त्यानंतर सर्व अक्षर लहान शब्दात असले पाहिजे. यामध्ये तुमचा पत्ता, ईमेल आयडी, फोन नंबर, वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स हे असणे गरजेचे आहे.

कामाची माहिती- Work Experience

इंटरव्यू घेणारा व्यक्ती सर्वात अगोदर तुमचा यापूर्वीच कामाचा अनुभव म्हणजे वर्क एक्सपिरीयन्सकडे लक्ष देत असतो. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी यापूर्वी काम केलेले असेल ते सर्वात गोदर लिहा. त्यामध्ये वर्क एक्सपिरीयन्स घेतलेल्या कंपनीचे नाव तुमचे पद आणि काम करण्याचा काळ हे सर्व यामध्ये अपलोड करा.

प्रोजेक्टस- Projects (Resume Tips)

हा सेक्शन फ्रेशर्स आणि एक्सपिरीयन्स होल्डर या दोघांसाठी असतो. यामध्ये तुम्हाला तुम्ही तयार केलेल्या प्रोजेक्ट बद्दल लिहावे लागेल. त्याचबरोबर जर तुम्हाला प्रोजेक्टसाठी कोणताही पुरस्कार देण्यात आलेला असेल तर प्रोजेक्टच्या वर हायलाईट करून याबद्दल माहिती द्या.

शिक्षण – Education

तुम्ही तयार करत असलेल्या रिझ्युममध्ये (Resume Tips) तुम्हाला तुमच्या शिक्षणासंबंधित डिटेल्स द्यावे लागतील. यामध्ये इंटरमिजिएट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा, पीएचडी यासह तुम्ही केलेल्या कोर्सचा उल्लेख असेल. त्याचबरोबर तुम्ही कोर्स कम्प्लीट केलेल्या संस्थेचे नाव देखील यामध्ये टाकणं गरजेचे आहे.

तुमच्यामध्ये असलेल्या कला – Skills

तुमच्या मध्ये असलेले स्किल्स तुम्हाला जॉब मिळवून देऊ शकतात. त्यासाठी तुमच्या रिझुममध्ये तुमच्याकडे असलेल्या वेगेवेगळ्या स्किल्स बद्दल माहिती लिहा.

उद्देश – Objective

रिझ्युम मध्ये तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी एक उद्दिष्ट लिहावे लागेल. म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीसाठी काय करू शकता, ज्यामुळे कंपनीला त्याचा फायदा होईल आणि कंपनीचा विकास होईल हे तुम्हाला यामध्ये लिहावे लागेल.