Retail Inflation : किरकोळ महागाई दरात मोठी घसरण; सणासुदीच्या काळात जनतेला दिलासा

Retail Inflation : सणांचा काळ म्हणजे सगळीकडेच आनंदाचं वातावरण असणं साहजिक आहे, काही लोकं तर यावेळी मुदामून नवीन गोष्टींची खरेदी करतात. विशेषतः यात नवीन गाडी, घर, सोन्याचे दागिने यांचा समावेश असतो. आता ग्राहकांसाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे दिवाळी आणि दसऱ्याआधीच आपल्याला महागाईच्या दरात घट झालेली पाहायला मिळणार आहे. किरकोळ महागाईच्या दरामध्ये (Retail Inflation) घसरण झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.83 असा आहे. आता भाजीपाला आणि अन्नाधान्यांच्या किरकोळ महागाईत घट झाली आहे…

महागाईची चिंता मिटली (Retail Inflation)

जुलै 2023 मध्ये किरकोळ महागाईचा आकडा 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांच्या उचांकावर पोहोचला होता, मात्र RBI कडून आता हा दर 6 टक्क्यांच्या पातळीच्या खाली आणण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणजे अन्न धान्याच्या दरांमध्ये आता घट झाली आहे, गेल्या महिन्यात हाच दर 6.56 टक्क्यांवर होता. गावातील जनता यामुळे हैराण झाली होती मात्र आता ग्रामीण भागातील किरकोळ महागाईचा दर 5.33 टक्के असल्याने अन्नधान्याच्या महागाईचा दर 6.65 टक्के झाला आहे.

खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्या:

मागच्या महिन्यात अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. हा दर 26.14 टक्क्यांवर ऑगस्ट महिन्यात होता जो कि आता 3.39 टक्क्यांवर आला आहे. यात डाळ मात्र अपवाद ठरत आहे कारण ऑगस्टमध्ये 13.04 असलेला हा दर आता 16.38 टक्के झाला आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने किरकोळ महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय ठरवले होते, आता या किरकोळ महागाईच्या दरांमध्ये घसरण झाल्यामुळे बँकला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच महागाईच्या दरांमध्ये (Retail Inflation) घसरण झाल्यामुळे हा सणांचा काळ देशातील जनतेसाठी आनंदाचा असण्याची शक्यता आहे.