बिझनेसनामा ऑनलाईन । दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येकाच्या घरात सध्या खरेदी करण्याची धावपळ सुरु झाली आहे. मात्र इथे एकच अडथळा मध्ये येतोय तो म्हणजे महागाई. वाढती महागाई सर्वांच्या आनंदावर विरजण टाकणारी आहे. याच गोष्टीचं गांभीर्य लक्ष्यात घेऊन सरकार सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलं आहे. तांदळाच्या वाढत्या किमतींवर (Rice Price) नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारकडून तांदळाच्या निर्यात शुल्काची (Export charges) मुदत पुढच्या वर्षापर्यंत वाढवली आहे. यामुळे तांदळाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्काच्या मुदतीत वाढ केल्यामुळे आता व्यापाऱ्यांना 31 मार्च 2024 पर्यंत तांदळाच्या निर्यातीवर शुल्क भरावे लागणार आहे. तज्ञांच्या मते यामुळे बाजारातील तांदूळ कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत उकडलेल्या तांदळाच्या निर्यात किमतीवर (Rice Price) सरकारकडून 20% शुल्क लावण्यात आले होते, जो निर्णय बदलून 16% करण्यात आला. हि किंमत या महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. मात्र आता दिवाळी दसरा तसेच नवरात्रीचा काळ असल्यामुळे तांदळाची मागणी वाढत जाईल, या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या किमती वाढू नयेत म्हणून सरकारकडून 16 ऑक्टोबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत तांदळाच्या निर्यात किमती वाढवल्या आहेत.
या आधी सुद्धा केले होते प्रयत्न: Rice Price
मोदी सरकारकडून आधी सुद्धा तांदळाच्या वाढत्या किमतींवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यांनी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याच्या परिणामी देशात तांदळाचा साठ वाढून किमती आटोक्यात राहण्यास मदत होईल. लक्ष्यात घ्या आपला देश सर्वात मोठा तांदळाची निर्यात करणारा देश आहे. यावर्षी आपण एप्रिल ते जून महिन्यात एकूण 15.54 लाख टन गैर बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात केली होती. गेल्या वर्षी हा आकडा 11.55 होता त्यामुळे यावर्षी आपण निर्यातीत सकारात्मक वाढ केली आहे.