Richest Indians: भारतात वाढतेय श्रीमंतांची संख्या; नेमकं कारण तरी काय?

Richest Indians: ही बातमी प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाची आहे, कारण हुरून इंडियाच्या माहितीनुसार भारतातील अब्जाधीशांच्या यादीत वाढ झाली आहे. नवीन माहितीनुसार आपल्या देशात 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या लोकांमध्ये 270 नवीन नावं जोडली गेली आहेत आणि याउलट चीन आणि आम्रिकेतील श्रीमंत लोकंच्या संख्येत घसरण होत आहे.

भारतात श्रीमंतांची संख्या वाढतेय: (Richest Indians)

हुरूनच्या अध्यक्ष्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन आकडे भारताची बळकट स्थिती दर्शवितात. नवीन यादीनुसार आपल्या देशात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले एकूण 1,319 लोकं वावरत आहेत आणि महत्वाची बाब म्हणजे या आकड्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत 76 टक्क्यांची वाढ झाली आहे.

हुरूनचे अध्यक्ष पुढे असेही म्हणाले की या आकड्यांवरून भारतात असलेली सकारात्मक परिस्थिती दिसून येते, भारतातील उद्योगपती हे इतरांच्या तुलनेत बऱ्यापैकी आशावादी आहेत आणि हीच जिद्ध देशाला पुढे घेऊन जाईल. बाकी चीन आणि युरोपबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला होता, ते म्हणाले की जर का ही परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ या प्रदेशांसाठी कठीण जाणार आहे (Richest Indians). आपल्या भारतात सुरु असलेली व्यवसायाची पद्धत ही बऱ्यापैकी पिढीजात आहे तर दुसरीकडे अमेरिकेत 60 टक्के ते 70 टक्के व्यवसाय हे पहिल्यांदा सुरु केले गेलेत. सर्वात शेवटी ते म्हणाले की येणाऱ्या काळात बऱ्यापैकी AI आणि इलेकट्रीक वाहनांच्या क्षेत्रात काम करणाऱ्याचे पेटारे भरणार आहेत.