RIL Holding Pattern: नुकताच देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा Pre Wedding समारंभ पार पडला आणि त्याची चर्चा देशभर रंगली. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मार्केटमध्ये देखील उत्तम कामगिरी करत आहे आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतायत. Telecom पासून ते Green Sector पर्यंत रिलायन्सचा विस्तार होतोय आणि धीरूभाई अंबानी यांनी स्थापन केलेली ही कंपनी आज भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक बनली आहे.
कोण आहे अंबानी समूहाची खरी मालक? (RIL Holding Pattern)
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासोबतच आता त्यांची तीन मुले ईशा, आकाश आणि अनंत अंबानीही कंपनीच्या कारभारात सक्रिय सहभाग घेत आहेत. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कंपनीचे सर्वाधिक शेअर्स या पाचही जणांकडे नाहीत.मुकेश अंबानी यांची आई कोकीलाबेन अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या खऱ्या मालकीण आहेत आणि त्यांच्याकडे कंपनीचे सर्वाधिक शेअर आहेत.
अंबानी भाऊबहिणींमध्ये कंपनीचे समान प्रमाणात शेअर वाटले असून, मुकेश आणि नीता अंबानी यांच्याकडेही प्रत्येकी इतकेच शेअर आहेत(RIL Holding Pattern). या सर्वांकडे कंपनीचे 80 लाख 52 हजार 21 शेअर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील अंबानी परिवारातील सर्वात मोठी शेअरधारक आहेत आणि त्यांच्याकडे कंपनीचे 1 कोटी 57 लाख 41 हजार 322 शेअर आहे.