RIL Q3 Results: IT क्षेत्राने जाहीर केलेला तिमाही निकाल काही बाजाराला रुचला नव्हता, यामुळे केवळ तज्ञांचा अपेक्षाभंग झाल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि कंपनीच्या कामगिरीवर बाजार देखील खुश आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात मुकेश अंबानींच्या कंपनीने 11 टक्क्यांची बाजी मारत 19,641 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, परिणामी कंपनीचा नेट रेव्हेन्यू (Net Revenue) 3.2 टक्क्यांनी वाढून 248,160 कोटी रुपयांवर पोहोचलेला पाहायला मिळतो.
रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केला तिमाही निकाल: (RIL Q3 Results)
आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीतील कंपनीचे आकडे पहिले तर नक्कीच त्यांनी जोरदार कामगिरी पार पाडली असल्याची खात्री पटते. रिलायन्स कंपनीने शुक्रवारी म्हणजेच 19 जानेवारी रोजी तिमाही निकाल जाहीर केला, ज्यात गेल्यावर्षी 240,532 कोटी रुपये असलेल्या ग्रोस रेव्हेन्यूमध्ये (Gross Revenue) वाढ झालेली दिसते, आणि आता हा नवीन आकडा 248,160 कोटी रुपयांवर येऊन पोहोचला आहे. कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये (Net Profit) देखील मागच्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून यंदाचा आकडा 19,641 कोटी रुपयांवर येऊन पोहोचला आहे. गेल्या वर्षात कंपनीचा EBITDA 38,286 कोटी रुपये होता, ज्यात यंदाच्या वर्षी 16.7 टक्क्यांची वाढ झाल्याने तो 44,678 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
रिलायन्सच्या उपकंपन्या देखील अग्रेसर :
रिलायन्स कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या उपकंपन्या जसे की रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ यांनी देखील कमालीची भूमिका बजावली. या दोन्ही उपकंपन्यांचे तिमाही निकाल सुखावणारे आहेत. रिलायन्स रिटेल या कंपनीने Grocery, Fashion, Lifestyle आणि Consumer Electronicsच्या व्यवसायात बाजी मारली. सादर केलेल्या तिमाही निकालात त्यांच्या ग्रोस रेव्हेन्यूमध्ये 22.8 टक्क्यांची वाढ झाली असून नवीन आकडा 83,063 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे, त्यामुळे यंदाच्या तिमाहीत कंपनीने एकूण 3165 कोटी रुपयांचं नफा कमावला आहे (RIL Q3 Results).
दुसऱ्या बाजूला रिलायन्सची टेलिकॉम कंपनी म्हणजेच रिलायन्स जिओने सुद्धा भरगोस नफा कमावला आहे. कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये वाढ झालेली असून आता नवीन आकडा 32,510 कोटी रुपयांवर पोहोचला आणि या प्रसिद्ध कंपनीने कमावलेला एकूण नफा 5445 कोटी रुपयांच्या घरात जमा झाला. कंपनीचे मालक मुकेश अंबानी या जोरदार कामगिरीमुळे खुश आहेत, रिलायन्स जिओ 5G सेवा यशस्वीपणे पुरवण्यात कार्यरत आहे याचा त्यांना अभिमान वाटतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार रिटेल सेगमेंटने चांगले आर्थिक परिणाम दाखवले आहेत. तेल आणि वायू व्यवसायाने आतापर्यंतच्या तिमाहीत सर्वाधिक EBIDTA पोस्ट केले असून KG D6 भारताच्या एकूण गॅस उत्पादनात 30 टक्के योगदान देत आहे.