Rituraj Sharma Success Story : आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात जी सामान्य परिस्थितीमधून काही असामन्य गोष्टी करून दाखवतात आणि म्हणूनच त्यांची आपण वाहवा करतो, उदाहरण म्हणून डोळ्यांसमोर ठेवतो. आज आपल्यापैकीच अश्या एका तरुणाची गोष्ट उलघडून पाहूयात. नवनवीन बदल आणि तांत्रिक विकास पाहत सर्वसाधारणपणे मनाची एक समजून झालेली असते कि पैसे मिळवाचे असतील तर गाव सोडून, शेती मागे सारून बाहेर पडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खरं तर मेहनती माणूस कुठल्याही परिस्थतीत कष्ट घेणं थांबवत नाही वा परिस्थितीला जबाबदार ठरवत नाही, आणि म्हणूनच तो शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद ठेवतो. कोणताही माणूस जन्मापासून काही असामान्य शक्तींचा आशीर्वाद मिळवून येत नाही, पण केवळ मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास त्याला पुढे जात राहण्याचे बळ देतो. अलीकडच्या काळात शेती आणि बगयातीच्या क्षेत्रातही अनेक बदल घडत आहेत आणि याच क्षेत्रात स्वतःचे नाव करून दाखवलेल्या ऋतुराज शर्मा यांची गोष्ट आज जाणून घेऊया….
कोण आहे ऋतुराज शर्मा? (Rituraj Sharma Success Story)
राजस्थानमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षीय मुलाने कृषी क्षेत्रात काही नवीन प्रयोग करून दाखवले आहेत. आणि त्याच्या या कामगिरीमधून शेती करून देखील आर्थिक प्रगती करता येते याचे उत्तम उदाहरण त्याने देशातील इतर तरुणांसमोर मांडले आहे. ऋतुराजने गुडगावमध्ये Zettafarms नावाची एक कंपनी उभारली आहे, आणि हि कंपनी कॉर्पोरेट शेती करते. आता कॉर्पोरेट शेती म्हणजे नेमकं काय? तर ऋतुराज आणि त्यांची टीम या संकल्पानेच्या अंतर्गत काही जमिनी भाड्याने विकत घेतात आणि त्या जमिनींवर विविध धान्ये, फळ-भाज्या आणि भाजी-पाल्याचे उत्पादन करतात. स्वतः B.Tech आणि MBAची पदवी मिळवल्यानंतर ऋतुराज शर्मा या क्षेत्रात उतरला आहे, आणि Zettafarms हा त्याचा तिसरा व्यवसाय आहे (Rituraj Sharma Success Story).
Zettafarms नेमकं कसं काम करते?
Zettafarms हि ऋतुराज शर्माने सुरु केलेली कृषी क्षेत्रातली एक व्यावसायिक कंपनी आहे. अनेकवेळा एकाच ठिकाणी किंवा एकाच पिकाची शेती हानिकारक ठरू शकते, आणि म्हणूनच Zettafarms विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शेती करून पीक उगवतात. हि बाजारातील इतर कंपन्यांप्रमाणेच काम करणारी कंपनी आहे त्यामुळे इथे मार्केटिंग, मेनेजमेंट, फायनान्स असे विविध विभाग देखील पाहायला मिळतात.
Zettafarms शेती करण्यासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करते ज्यात विशेषतः मातीच्या परीक्षणापासून इतर महत्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित केले जाते. हि कंपनी संसाधनांचा योग्य वापर करण्यावर लक्ष केंद्रित करून काम करत असल्याने त्यांचे उत्पादन आणि कंपनीचा नफाही वाढत आहे. Zettafarmsच्या कामात ठिबक सिंचन, औषधे, किटकनाशक व्यवस्थापन यांसारख्या पद्धतींचा अवलंब केला जातो.
ऋतुराज शर्मा याला शेती हा एक उत्तम व्यवसाय असू शकतो याची जाणीव जगाला करून द्यायची आहे (Rituraj Sharma Success Story) आणि या कामामधून त्याला लोकांना हाच संदेश लोकांना द्यायचा आहे कि शेती हा लोप पावलेला व्यवसाय नाही तर आजही इथून करोडो रुपयांचा व्यवसाय उभा केला जाऊ शकतो. इतर अनेक क्षेत्रांमध्ये 8 तास काम करण्याला जसे आपण भूषण मानतो तसेच हा देखील अभिमान वाटावा असाच व्यवसाय आहे. सध्या ऋतुराज शर्मा आपल्या ध्येयाप्रती काम करत असून वर्ष 2030 पर्यंत त्याला 50 हजार एकर शेती करून दाखवत जगासमोर उदाहरण ठेवायचे आहे.