Road Development : भारत सध्या जोमाने प्रगती करण्याच्या मार्गावर आहे, आणि केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते देशाची आर्थिक स्थिती बळकट होण्यात रस्त्यांच्या सशक्तीकारणाने मोठा हातभार लावला जातोय. आजतकच्या ‘अजेंडा आजतक’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत वक्तव्य केले होते. कधीही आजूबाजूला रस्त्याच्या कामात गुंतलेल्या अनेक कामगारांना तुम्ही पाहिलंच असेल, केंद्रीय मंत्र्यांच्या मते रस्ते बनवण्याच्या याच प्रक्रियेमुळे अनेकांना रोजगार मिळतो, आणि आर्थिक मदत दिली जाते. एखाद्या देशातील खड्डेमुक्त रस्ते देखील त्यांची प्रगतीच दाखवून देत नाहीत का? म्हणूनच नितीन गडकरी म्हणतात कि 5 ट्रिलियनचे स्वप्न गाठत असताना सरकार इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देतोय आणि म्हणूच विविध राज्यांना जोडणारे देशांतर्गत रस्तेही महत्वाचे आहेत.
रस्ते बनवण्यातून निर्माण होतो रोजगार: Road Development
आजतक सोबत बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी रस्त्याच्या कामातून रोजगार कसा निर्माण होतो याकडे विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांच्या मते वेळोवेळी देशात सुरु असलेल्या रस्ता सुशोभीकरणामुळे (Road Development) लोकांना पैसे कमावण्याची संधी मिळते. आपल्या देशात अशी अनेक राज्ये आहेत ज्यांच्याकडे काही विशिष्ठ काळात पर्यटक आकर्षित होत असतात, अश्या राज्यांमध्ये असलेल्या रस्त्याच्या उत्तम सोयीमुळे पर्यटकांची संख्याही वाढते आणि परिणामी तिथल्या हॉटेल्स आणि रेस्टोरंटसना फायदा होतो.
रस्त्यावर होणारे अपघात मात्र कायम:
यानंतर नितीन गडकरी याना रस्त्यावर होणाऱ्या अपघातांविषयी प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी विभागाकडून यासंबंधित हवी तशी कार्यवाही केली गेलेली नाही असे त्यांनी कबुल केले. मात्र सरकार याबद्दल प्रयत्नशील असून गाड्यांमध्ये आता 6 एअरबॅग्सची सोय करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी प्रेक्षकांना दिली. नितीन गडकरी पुढे म्हणाले कि अपघातांविषयी सरकार अजून तरी माणसाची वागणूक बदलू शकलेले नाही, मात्र मीडियाच्या साहाय्याने वेळोवेळो जनतेला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मात्र ते नक्कीच देत आहेत. त्यांना विश्वास आहे कि अद्याप रस्त्यावरील अपघात टळलेले नसले तरी येणाऱ्या काळात यावर नक्कीच नियंत्रण आणण्यात विभाग यशस्वी होईल.
महामार्गांच्या विकासाने लोकांना पोहोचवली मदत:
देशांतर्गत असलेल्या रस्त्यांना मोठाल्या राज्यांशी जोडणं, किंवा ज्या भागांमध्ये ट्राफिकची संख्या अधिक आहे तिथल्या रस्त्यांची आणि महामार्गांच्या विकासाची जबाबदारी परिवहन महामार्ग मंत्रालयाची आहे, अश्या महामार्गांना मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय महामार्गांशी जोडलं जातंय अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी यांच्या मते रस्त्यांचा विकास केल्याने (Road Development) विविध क्षेत्रांमध्ये गतिमानता यायला मदत होते आणि परिणामी देशाची आर्थिक स्थिती सुधारते. उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथ आणि बाकी अनेक धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विकास झाल्याने लोकांना मदत मिळाली आहे. यापुढेही मंत्रालयाकडून देशातील रस्त्यांच्या विकासावर भर दिली जाणार आहे आणि सर्वाधिक लक्ष महामार्गांच्या निर्मितीवर दिले जाईल.