बिझनेसनामा ऑनलाईन । Royal Enfield म्हटलं कि बुलेट अन गाडीच्या फायरिंगचा आवाज कानात घुमतो. मागील अनेक वर्षांपासून रॉयल एन्फिल्ड हि कंपनी आपल्या भन्नाट दुचाकींच्या माध्यमातून तरुण वर्गाला भुरळ घालत आहे. कॉलेजच्या युवकांपासून ते अगदी सैराटच्या आर्ची पर्यंत बुलेटची क्रेझ असल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का कि एकेकाळी रॉयल एन्फिल्ड हि कंपनी अक्षरशः बंद पडायला आली होती. मात्र असे असूनही आज या कंपनीचा बिझनेस ८० हजार कोटींच्या घरात आहे. कंपनीने असा कोणता निर्णय घेतला जो कंपनीच्या व्यवसायासाठी गेम चॅजर ठरला हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
Royal Enfield च्या यशात कंपनीचा CEO सिद्धार्थ लाल यांची भूमिका महत्वाची आहे. स्वतःला सिद्ध करायचे असेल तर कष्टाची त्याच बरोबर नवीन नवीन संकल्पनाची जोड असेल तर काहीही शक्य आहे. बंद पडायला आलेल्या रॉयल एन्फिल्डला आज एक यशस्वी कंपीनी बनवणाऱ्या सिद्धार्थ लाल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. वयाच्या २६ वर्षी रॉयल एनफिल्डचे CEO म्हणून त्यांनी कामाची धुरा हाती घेतली होती. कंपनीला एक तरुण CEO मिळाल्यामुळेच कदाचित बुलेटला तरुणांच्या गळ्यातील ताईत बनवण्यात कंपनी यशस्वी झाली.
रॉयल राजा – आज रॉयल एनफिल्ड चा राजा म्हणून सिद्धार्थ लाल याना ओळखले जाते. पण हि ओळख त्यांना सहज मिळालेली नाही. आपण सिद्धार्थ यांनी नक्की काय केले जे कंपनी यशाच्या शिखरावर घेऊन गेले हे पाहुयात. कदाचित तुम्हालाही तुमच्या व्यवसायात यामधून काही दिशा मिळू शकेल.
सिद्धार्थ यांचे शिक्षण अन जीवनप्रवास कसा होता?
विक्रम लाल यांचा मुलगा म्हणजे सिद्धार्थ लाल. सिद्धार्थ यांनी दिल्ली यूनिव्हर्सिटी मधून अर्थशास्त्र या विषयामधून डिग्री घेतली तसेच मेकॅनिक इंजिनीरिंग डिग्री इतकेच न्हवे तर त्यांनी UK युनिव्हर्सिटी मधून ऑटो इंजिनीरिंग मास्टर डिग्री घेतली.
रॉयल एनफिल्ड ला मिळाले नवीन आयुष्य –
रॉयल एनफिल्ड हि नामाकीत कंपनी डबघाईला आली होती. त्या दरम्यान असे काय झाले कि आज रोड वर, प्रत्येक घराघरामध्ये रॉयल एन्फिल्ड दिसतेय. साधारण २००० साली कंपनी चेअरमन विक्रम लाल यांनी मॅनेजमेंट ला रॉयल एन्फिल्ड चे उत्पादन बंद करण्यास सांगिले होते. त्यावेळी कंपनी ला मोठ्या प्रमाणात तोटा झाला होता. पण सिद्धार्थ यांनी वडिलांकडे थोडा वेळ मागून घेतला. आणि कंपनीच्या अपयशाची कारणं शोधायला सुरवात केली.
सिद्धार्थ यांनी स्वतःला CEO या पदापुरतं मर्यादेत न ठेवता कंपनीला तोटा का होतोय हे शोधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करायला सुरवात केली. जर आपण एक ग्राहक म्हणून विचार केला तर कंपनी किंवा व्यवसाय नफ्याच्या दिशेनं घेऊन जाता येतो असं सिद्धार्थ यांचं मत आहे. जोपर्यंत ग्राहकाला कंपनीकडून नक्की काय अपेक्षित आहे हे समजत नाही तोवर कंपनी यशस्वी होऊच शकत नाही. सिदार्थ यांनी रॉयल एन्फिल्ड स्वतः वापरण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांना त्यामध्ये कोणत्या गोष्टी कमी आहेत हे समजण्यास सुरुवात झाली. त्यानुसार त्यामध्ये बदल केले. त्यांनी BE THE CHANGE हे तत्व वापरले . रॉयल एन्फिल्ड ला चालवणारे लोक हे इतरांपेक्षा वेगळे असतात हे पटवून दिले. रॉयल इनफिल्डचे तरुण पिढीला आकर्षण कसे वाटेल यावर त्यांनी काम केले. आज बुलेट तरुणांची पहिली पसंती बनली आहे. स्पीड, स्टाईल, लुक आणि लक्झरीची अनुभूती देणाऱ्या रॉयल इन्फिल्ड या बाईक कंपनीची एकूण संपत्ती 54 हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.
2022 मध्ये 8.34 लाख बाईक विकल्या गेल्या –
सध्या रॉयल एनफिल्डची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये कंपनीने 8,34,895 मोटारसायकली विकल्या, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. या विक्रीमुळे समूहाला 714 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. एवढी मागणी असूनही कंपनीने किमती वाढवल्या नाहीत. Bullet 350 आणि Classic 350 व्यतिरिक्त, दोन सिलिंडर इंजिन असलेल्या बाइक्सना भारतात आणि परदेशातही खूप मागणी आहे. सिद्धार्थ यांनी बिझनेस हाती घेतला आणि बंद पडत आलेली रॉयल इनफिल्ड 80 हजार कोटींची बनवली.