Rules Change From 1st December 2023 :आज नोव्हेंबर महिन्याची शेवटची तारीख आणि उद्यापासून वर्ष 2023 चा शेवटचा महिना असलेला डिसेंबर मी महिना सुरु होईल. लवकरच आपण वर्ष 2024 ची नवीन सुरुवात करू. मात्र त्याआधी काही महत्वाच्या गोष्टींची तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. बँकच्या क्रेडीट कार्डपासून ते थेट मोबाईलच्या सीम कार्ड पर्यंत अनेक बदल घडलेले पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे वेळेआधीच आम्ही काही गोष्टी तुम्हाला सुचवणार आहोत, त्या नीट समजून घ्या आणि त्यानुसार कामाची आखणी करा.
सिम कार्डचे बदलले हे नियम:
असं म्हणतात की मोबाईल हातात केवळ गरज राहिलेली नसून ते एक व्यसन झालंय, त्यामुळे कोपऱ्या कोपऱ्यात प्रत्येकाजवळ निदान एक स्मार्टफोन तरी नक्कीच असतो. मोबाईल म्हटलं की सिम कार्ड हा त्यातला अत्यावश्यक घटक ठरतो. त्यामुळे सिम कार्डमध्ये होणाऱ्या बदलांविषयी तुम्हाला नक्कीच माहिती असायला हवी. केंद्र सरकार सिम कार्डच्या खरेदी विक्रीचे नियम आता लवकरच बदलणार आहे, हे नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून (Rules Change From 1st December 2023) संपूर्ण देशात लागू करण्यात येतील. या नियमांच्या आधारे एका ओळखपत्रावरून अनेक सिम कार्ड खरेदी करता येणार नाही त्यावर काही प्रमाणात नियंत्रण लावण्यात आले आहे, तसेच ग्राहकांना सिम कार्डची खरेदी करण्याआधी KYC च्या नियमांचे पालन करावे लागेल.
UPI ID चे नियम बदलले: Rules Change From 1st December 2023
तुम्हाला माहित आहे का नवीन नियमानुसार, आता काही उपयोगात नसलेले युपीआय आयडी (UPI ID) हे लगेचच बंद करण्यात येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉपरेशन ऑफ इंडिया यांनी एका वर्षापेक्षा जास्त काळ चालू नसलेल्या UPI ID आणि मोबाईल नंबर यांना तात्काळ बंद करून टाकण्याचा आदेश दिलेला आहे. थर्ड पार्टी एप प्रोव्हायडर आणि पेमेंट सर्विस प्रोव्हायडर हे काम आज किंवा 1 डिसेंबर पर्यंत करून पूर्ण करतील.
LPG गॅस किमती देखील बदलणार:
दर महिन्याप्रमाणे यावेळी सुद्धा पहिल्या तारखेला LPG सिलेंडर, CNG आणि PNG च्या किमती बदलू शकतात. हा काळ सध्या लग्नसराईचा असल्यामुळे जास्तीत जास्त सिलेंडर आणि बाकी गोष्टींची गरज भासणार आहे त्यामुळे बाजारातील वाढती मागणी पाहता खरोखरच या किमतीमध्ये मोठा बदल येऊ शकतो.
बँक लॉकरचे हे नवीन नियम:
तुम्ही बँक मध्ये स्वतःच्या मौल्यवान वस्तू आणि पैसे जपून ठेवले आहेत का? हो तर ही बातमी नक्की वाचा कारण रिझर्व बँक ऑफ इंडियाने सुरक्षित लॉकर करारा संदर्भात काही महत्त्वाच्या नियमांची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे आणि आज म्हणजे 31 डिसेंबर ही त्यासाठी अंतिम तारीख आहे. ज्यांनी 31 डिसेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी बदललेल्या बँक लॉकर करारनामा सादर केला आहे त्यांना पुन्हा एकदा लॉकर करारावर स्वाक्षरी करून ते सबमिट करणे अनिवार्य आहे
पेन्शन बाबत हे नियम बदलणार:
राज्य तसेच केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या बदलांना सामोरे जावं लागणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होतं असे न केल्यास पुढील पेन्शन त्यांना मिळणार नाही यासाठी 80 वर्षांवरील व्यक्तींना एक ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर आणि 60 वर्षांवरील व्यक्तींना आणि 80 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर अशी वेळ देण्यात आली होती.