बिझनेसनामा ऑनलाईन । आज २८ जुलै असून २ दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होईल. त्यामुळे तुमचे काही काम पेंडिंग असतील तर लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे. बँका आणि काही संस्थांनी तयार केलेले तत्वे हे महिन्याच्या एक तारखेपासून लागू होत असतात. त्यानुसार एक ऑगस्ट पासून काही नियम बदलण्यात येऊ शकतात आणि या नियमांचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या राहणीमानावर आणि खर्चावर पडू शकतो. त्याचबरोबर पेंडिंग कामांवर पैशांच्या स्वरूपात पेनल्टी देखील लागू शकते. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात ….
१) ई चलन गरजेचे-
वित्त मंत्रालयाने जीएसटी प्रणाली संदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये 5 कोटी पेक्षा जास्त टर्नओव्हर वाल्या बिजनेस ला 1 ऑगस्ट पासून इनवोईस तयार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्व B2B व्यवहार करण्यासाठी, B2B व्यवहार मूल्य 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कंपन्यांना आणि 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक किंवा ई-चलन तयार करणे गरजेचे आहे.
२) ऑगस्ट महिन्यात बँकांना आहे 14 दिवस सुट्ट्या
तुम्ही ऑगस्ट महिन्यात बँकेत जाणार असाल तर या महिन्यातील सणासुदीच्या नियोजना नुसारच बँकेत जाण्याचा निर्णय घ्या. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये 14 दिवस बँकेला सुट्ट्या देण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने ग्राहकांसाठी सुट्ट्यांची लिस्ट जारी केली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये बरेच सण उत्सव, जयंती आणि शनिवार रविवार असल्यामुळे 14 सुट्ट्या मिळत आहेत. यामुळे ग्राहकांची धावपळ होऊ नये यासाठी आरबीआय ने या सुट्ट्यांची लिस्ट जारी केली. त्यानुसार तुम्ही नियोजन करून बँकेत जाऊन तुमचे काम पूर्ण करू शकतात.
३) या दिवशी बंद राहतील बँका
6 ऑगस्ट रविवार, 8 ऑगस्ट गँगटोक मध्ये सुट्टी, 12 ऑगस्ट दुसरा शनिवार, 13 ऑगस्ट रविवार, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 16 ऑगस्ट पारसी नववर्ष, 18 ऑगस्ट श्री शंकर तिथी, गुवाहाटीमध्ये सुट्टी, 20 ऑगस्ट रविवार, 26 ऑगस्ट चौथा शनिवार, 27 ऑगस्ट रविवार 28 ऑगस्ट ओणम, 29 ऑगस्ट तिरुओनम, 30 ऑगस्ट रक्षाबंधन, 31 ऑगस्ट श्री नारायण गुरु जयंती.या सर्व दिवशी बँका बंद राहणार आहेत.
४) ITR भरण्यासाठी द्यावी लागेल पेनल्टी
आयकर विभागाने वेबसाईटवर या 15 कामांची लिस्ट जारी केली. त्यानुसार टॅक्स पेयर 31 जुलै पर्यंत त्यांचा आयकर रिटर्न भरू शकणार नाही. जर तुम्ही आधार कार्ड पॅन ला लिंक केले नसेल आणि आयटीआर टॅक्स भरलेला नसेल तर तुम्हाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाने 30 जून पर्यंत ज्यांनी पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक केलेलं नाही, त्यांचं पॅन कार्ड इन ऑपरेटिव्ह केलं आहे. यामुळे टॅक्स न भरणाऱ्या व्यक्तीला 15 काम करता येणार नाही. तुम्ही 31 जुलै नंतर टॅक्स भरला तर तुम्ही बिलेटेड ITR या नावाने तो दाखल होईल. आणि तुम्हाला बिलेटेड फीस म्हणजेच आयटी टॅक्स वर पेनल्टी द्यावी लागेल. जो वर्षाला 5 लाख रुपये कमावणाऱ्यांना 5000 रुपये आहे. एवढंच नाही तर पॅन कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी 1000 रुपये दंड सुद्धा द्यावा लागेल. म्हणजेच 6000 रुपये पेनल्टी तुम्हाला द्यावी लागेल.
५) गॅस सिलिंडरच्या किमती बदलणार?
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलेंडर, तेल कंपन्या आणि सीएनजी हे नवीन दर जारी करत असतात. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी जास्त होत आहेत. त्याचबरोबर एप्रिल मे मध्ये 19 किलो वाल्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झाली होती. पण घरगुती सिलेंडर मध्ये कोणता बदल करण्यात आला नव्हता. त्यामुळे या महिन्यामध्ये घरगुती सिलेंडरचे दर कमी होणार कि वाढणार हे पाहावं लागेल.