Rules Changes From 1 November 2023 : ऑक्टोबरचा महिना संपायला आता काहीच दिवस बाकी आहेत, आणि नंतर आपण नवीन महिन्याची सुरुवात करणार आहोत. पण जसं कि आपल्याला माहिती आहे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी काही ना काही बदल हे घडत असतात आणि त्यांची काळजीपूर्वक जाणीव करून घेणे हि आपली जबाबदारी आहे. आज आम्ही तुम्हाला नोव्हेंबर महिन्यापासून लागू होणाऱ्या काही महत्वाच्या आर्थिक बदलांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुमची महत्वाची कामं अडकून राहणार नाहीत.
१) सिलिंडरच्या किमती बदलणार:
दर महिन्याच्या सुरुवातीला सिलिंडरच्या किमती बदलत असतात. गेल्या महिन्याचा एकंदरीत अंदाज घेत नवीन महिन्याच्या सुरुवातीला या किमती वाढू शकतात, कमी केल्या जाऊ शकतात किंवा आहे तशा राहू शकतात.
२) GST चलन अपलोड करावे लागणार: Rules Changes From 1 November 2023
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) च्या आदेशानुसार 100 कोटी रुपयांपेक्षा जास्ती उलाढाल असलेल्या व्यवसायांना तीस दिवसांच्या मुदतीला धरून 1 नोव्हेंबर पासून ई- चलन पोर्टलवर GST चलन अपलोड करावे लागणार आहे.
३) आयातीचे शुल्क वाढणार:
सरकारने जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार HSN 8741 श्रेणीतील लॅपटॉप, टॅब्लेट, वैयक्तिक संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर 30 ऑक्टोबरपर्यंत सूट देण्यात आली होती, आता नवीन महिन्यात या दरांमध्ये काहीतरी बदल घडण्याची शक्यता आहे. (Rules Changes From 1 November 2023)
४) स्टोक एक्सचेंजचे शुल्क वाढणार:
बॉम्बे स्टोक एक्सचेंजने जाहीर केल्यानुसार 1 नोव्हेंबर पासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढवले जातील. हे बदल S and P BSE सेन्सेक्स पर्यायांना लागू होतील, या वाढत्या खर्चामुळे व्यापाऱ्यावर परिणाम होऊ शकतो.