Rum in Winter : या आहेत काही विशेष रम, थंडीच्या मौसमात घ्या मजा

Rum in Winter : थंडीचा महिना सुरु झालाय आणि आता अनेक लोकांची पाऊलं वळणार आहेत दारूकडे. दारू म्हटलं म्हणजे काही तरी वाईट आहे अशी समजूत करून घेण्याची गरज नाही. दारू हि जर का ठराविक मापात घेतली तर त्याचे औषधी फायदे नक्कीच आहेत. पण आजकाल ते एक मजा आणि मस्तीचं साधन झाल्यामुळे दारू पिण्याचं प्रमाण भरपूरच वाढलेलं आहे आणि कोणतीही गोष्ट हि एका ठराविक प्रमाणाबाहेर जाऊन केली कि त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतात. असो! आता रम बाजारात हमखास विकली जाईल तर आज आपण मार्केट मधील काही प्रसिद्ध रम बद्दल जाणून घेऊयात

या आहेत भारतीय बाजारातील काही प्रसिद्ध रम: Rum in Winter

१) कॅमिकारा- Camikara

ही भारतातील पहिली शुद्ध उसाच्या रसाची रम आहे. आणि या रमला प्रतिष्ठित IWSC पुरस्कार 2023 मध्ये सुवर्णपदक देण्यात आलं होतं. संस्कृत भाषेत कॅमिकारा याचा अर्थ सोन्याचं पेय असा होतो. हि एक प्रकारची जुनी रम असल्यामुळे आपल्या परंपरेत आणि इतिहासात तिला महत्व आहे. कॅमिकारा ही 12 वर्षे एक्स-बोर्बन बॅरल्समध्ये नैसर्गिकरित्या बनवली जाणारी रम आहे. यात कोणत्याही प्रकारची साखर, रंग किंवा इतर चविष्ट पदार्थ मिसळले जात नाहीत.

किंमत: 6,000/-

२) एल डोराडो- EL DORADO RUM

ही 12 वर्ष जुनी रम आहे. दक्षिण अमेरिकेच्या गयानामध्ये हिला डिस्टिल्ड केली जाते, जिथे ती ओक बॅरल्समध्ये एक दशकापेक्षा जास्त काळ साठवल्यानंतर तयार होते. यामध्ये टॉफी, व्हॅनिला आणि वाळलेल्या फळांच्या नोट्समुळे आपल्याला जिभेवर रेंगाळनाऱ्या मखमली गुळगुळीतपणाचा आनंद घेता येतो. एक आलिशान आणि अविस्मरणीय मद्यपानाचा (Rum in Winter) अनुभव देते जे रमच्या जाणकारांना आणि नवशिक्यांना सारखेच आकर्षित करण्यात यशस्वी होते.

किंमत: 4,000/-

३) ओरिजिनल डार्क

हि रम बार्बाडोस आणि जमैका येथील पारंपारिक रमचे मिश्रण आहे. प्लांटेशन ओरिजिनल डार्क रम प्रत्येक घोटात कॅरिबियनची चव देते. यात पिकलेले केळी, व्हॅनिला आणि बारीक किसलेल्या नारळाच्या किसाचा समृद्ध स्वाद असतो.

किंमत: 3,000/-

४) रॉन झकापा –

ग्वाटेमाला हायलँड्समध्ये समुद्रसपाटीपासून 2,300 मीटर उंचीवर असलेले, रॉन झकापा हि प्रीमियम रम उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. हि रम जवळपास 23 वर्ष जुनी आहे. आणि एवढी जुनी असून देखील तिच्या चवीमुळे हि रम आजही प्रसिद्ध आणि भरपूर मागणी असलेली म्हणून पाहायला मिळते. यात तुम्हाला डार्क चॉकलेट, ओक आणि सुक्या मेव्याची चव चाखायला मिळते. रॉन झकापा हि श्रीमंतीचे प्रतीक आहे.

किंमत: 7,000/-