बिझनेसनामा ऑनलाईन। प्रत्येक देशातील चलनाचे मूल्य हे नेहमी कमी – जास्त होत असते हे आपण खूप वेळा पाहतो . पण एखाद्या देशांच्या चलनाच्या मूल्यामध्ये वाढ हि चांगली गोष्ट आहे कि वाईट हे कित्येक जणांना समजत नाही . तसेच विनिमय दर कसे ठरतात हेही माहित नसते . आताच आपल्या देशाच्या रुपायाचे मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 11 पैशांनी वाढून 82.01 वर पोहोचला आहे . हि आपल्या देशासाठी सकारात्मक कि नकारात्मक हे आपण जाणून घेऊयात.
विनिमय दर म्हणजे काय? –
एका देशाचा दुसऱ्या देशाच्या चलनाशी ज्या दराने देवघेव होते त्या दरात विनिमय दर असे म्हणतात आणि ज्या चलनाला देशभरातून अधिक मागणी असते असे चलन वधारले ( कमी ) जाते आणि ज्यांना ते चलन अधिक हवे आहे त्याचे अवमूल्यन होते .
विनिमय दर कसा ठरतो –
एका डॉलरच्या तुलनेमध्ये भारताला किती रु द्यावे लागतात त्यावर विनिमय दर ठरत असतो . तसेच हा विनिमय दर आयात – निर्यातीवर ठरत असतो .पूर्वी विनिमय दरावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण होते पण १९९३ पासून विनिमय दर नियंत्रित केला जात नाही. भारताने जर निर्यात जास्त केली तर विदेशी चलनही जास्त मिळेल . आणि आयात कमी ठेवल्यास सकारात्मक ठरेल . आयाती मध्ये आपण ग्राहक असतो आणि निर्याती मध्ये आपण विक्रेते म्हणून निर्यात केल्यास आपल्या देशासाठी ते अनुकूल ( चांगले ) मानले जाईल .
आयातीपेक्षा निर्यात जास्त –
भारतीय रुपयाची मागणी वाढली आहे कारण भारताची निर्यात हि आयाती पेक्ष्या जास्त झाली आहे . रुपयाचे मूल्य वाढले आहे . म्हणजेच एका डॉलरसाठी कमी रुपये द्यावे लागणार आहेत .
रुपया 82.12 वरून 82.01 वर पोहचला आहे –
पूर्वी आपण एका डॉलरसाठी 82.12 रुपये देत होतो पण आता एका डॉलरसाठी आपण 82.01 रुपये देत आहे . म्हणजेच आता पॉईंट अकरा ( . 11 ) ने आपल्याला ते कमी द्यावे लागणार आहेत . म्हणजेच हि सकारात्मक बाब आहे .