S. Venkitaramanan Death : RBI चे माजी गव्हर्नर एस. व्यंकटरमण यांचे निधन

S. Venkitaramanan Death : देशाची सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर एस. व्यंकटरमण यांचे निधन झालं आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. व्यंकटरमण हे RBIचे अठरावे गव्हर्नर होते व वर्ष 1990 ते 1992 अश्या दोन वर्षांसाठी त्यांनी कामाची धुरा सांभाळली होती. याआधी त्यांनी वर्ष 1985 ते 1989 साली देशाच्या अर्थ मंत्रालयात सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

RBI च्या 18व्या गव्हर्नरांचे निधन: S. Venkitaramanan Death

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे अठरावे गव्हर्नर असलेले एस. व्यंकटरमण (S. Venkitaramanan Death) यांनी आरबीआयचे गव्हर्नर पद संभाळण्याआधी ते अर्थ मंत्रालयात सचिव म्हणून जबाबदारी साभाळत असत. बँकेचे गव्हर्नर म्हणून धुरा सांभाळत असताना आपला देश परकीय चलनांच्या बापतीत संकटांना तोंड देत होता आणि अश्या कठीण प्रसंगात एस. व्यंकटरमण यांनी आपल्या पदाची जबाबदारी उत्तम रीत्या निभावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण IMF कार्यक्रमाला सुरुवात केली, आणि याचा फायदा आपली आर्थिक परिस्थती सुधारण्यासाठी झाला होता.

एस. व्यंकटरमण यांचा जन्म 21 डिसेंबर 1931 रोजी त्रावणकोर येथे झाला होता. गव्हर्नर आणि सचिव म्हणून धुरा सांभाळण्या सोबतच ते कर्नाटक सरकारचे सल्लागार म्हणून काम करत असत. एस. व्यंकटरमण(RBI Governor Death) यांचा समाजकार्यातही सक्रीय सहभाग होता. एस. व्यंकटरमण यांच्या निधनानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी कुटुंबियांना शोक व्यक्त केला.