Sachin Tendulkar Investment : क्रिकेटचे मैदान गाजवून मास्टर ब्लास्टर म्हणून नाव कमावलेल्या सचिन तेंडुलकरला आपण क्रिकेटचा देव म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का सचिन तेंडुलकरने क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता इन्व्हेस्टमेंटच्या मैदानात जोरदार फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. गुंतवणूक तर आपण सगळेच करत असतो मात्र योग्य गुंतवणूक तीच जी वेळोवेळी तुम्हाला भरपूर नफा कमावून देऊ शकते. सचिन तेंडुलकरने सुद्धा एका IPO मध्ये ५ कोटींची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीनंतर अवघ्या ९ महिन्यात 18 कोटी रुपयांचा फायदा कमावलाय. हा IPO नेमका कोणता आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कोणत्या IPO ने सचिनला केलं मालामाल?
सचिन तेंडुलकरने मार्च महिन्यात एका इंजिनियरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या कंपनीमध्ये (Azad Engineering IPO) गुंतवणूक केली होती. आझाद इंजिनियरिंग नावाच्या कंपनीमध्ये सचिन तेंडुलकरने पाच कोटी रुपये गुंतवले होते, हि कंपनी टर्बान आणि एरोस्पेस पोर्ट्सची उत्पादक आहे. ते ऊर्जा, तेल आणि वायू तसेच एरोस्पेस आणि संरसक्षणच्या निगडित वस्तूंचा पुरवठा करतात. कंपनीने अलीकडेच आपला IPO बाजारात आणला होता ज्याच्या भरपूर फायदा सचिन तेंडुलकरला मिळाला आहे (Sachin Tendulkar Investment). सध्या तेंडुलकरने कंपनीचे 4,38,210 शेअर्स विकत घेतले आहेत.
सचिनला मिळू शकतो आणखीन फायदा : Sachin Tendulkar Investment
हैद्राबादमध्ये स्थित या इंजिनियरिंग कंपनीचा IPO पुढील आठवड्यात बाजारात येणार आहे. कंपनीने आपल्या इश्यूची किंमत 524 रुपये ठेवली आहे, या दराने जर का त्यांचा IPO लिस्ट झाला तर सचिन तेंडुलकरला येणाऱ्या काही दिवसांत 22.96 कोटी रुपयांचा फायदा मिळू शकतो. याचाच अर्थ असा कि सचिन तेंडुलकरला आता लवकरच मल्टीबॅगर परतावा मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्यात घ्या कि कंपनीचे शेअर्स जेवढे लिस्टेड होतात, तेवढाच गुंतवणूकदारांना जास्ती फायदा मिळत असतो.
सदर कंपनीमध्ये केवळ मास्टर ब्लास्टरच नाही तर अन्य दिगज्ज खेळाडूंनी गुंतवणूक केली आहे. यात PV सिंधू, सायना नेहवाल,VVS लक्ष्मण यांचा समावेश होतो. सचिन तेंडुलकरनंतर आठवड्याभरातच या खेळाडूंनी कंपनीमध्ये पैसे गुंतवले, असं म्हणतात कि तिन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 1 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे, ज्यासाठी त्यांना 228.17 रुपयांचा स्टेक खरेदी करावा लागला होता. सदर इंजिनियरिंग कंपनीचा ग्राहकवर्ग देखील मोठा आहे, यात MAN एनर्जी सोल्युशन्स, सिमेन्स एनर्जी, इटान एरोस्पेस इत्यादींचा समावेश होतो.