Sahara India Case मुळे भारत सरकार होणार मालामाल; 25,163 कोटी रुपये परत मिळवले

Sahara India Case : सहारा इंडिया हि कंपनी सध्या बरीच चर्चेत आहे. कंपनीवर काही गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याचा आरोप असून सध्या कंपनीचे मालक भारत देशाच्या बाहेर आहेत. सुब्रत रॉय हे कंपनीचे मालक होते व काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. कंपनीच्या अधिकृत मालकाचे निधन झाले असले तरीही तपासाच्या प्रक्रियेशी याचा काहीही संबंध नसल्यामुळे तपास कायम सुरूच राहील अशी माहिती या बापतीत सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे

Sahara India Case मुळे सरकार होणार मालामाल?

सहारा इंडिया कंपनीचे मालक सुब्रत रॉय यांच्या मृत्यूनंतर आता गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील कि नाही यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या सेबीकडून पैसे परत मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.सध्या अधिकारी या पैश्यांना कान्सोलीडेट फंडमध्ये परिवर्तीत करण्याचा विचार करत आहेत , असे करण्याचा केवळ उद्देश हा गुंतवणूकदारांचे पैसे परत करणे अस असून आत्तापर्यंत सहारा कंपनीकडून एकूण 25,163 रुपये परत मिळवण्यात आले आहेत. जे कि सध्या बँकांमध्ये जमा करवण्यात आलेत.

सेबीच्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्य न्यायालयासमोर मागणी केली होती कि सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचा पैसा त्यांना व्याजासहित परत देण्यात यावा. आणि न्यायालयाने देखील याला पूर्णपणे संमंती दिली असून तपासाच्या शेवटी ज्या पैश्यांना कुणीही वाली नसेल ती रक्कम सरकार जमा करण्यात येईल असा आदेश देण्यात आला आहे. (Sahara India Case).

हे पैसे परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांचा मोबाईल नंबर त्यांच्या आधार कार्डसोबत जोडलेला असणे फारच गरजेचे आहे. यानंतर गुंतवणूकदारांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन रिसीट दाखवल्यानंतर गुंतवलेली रक्कम ते परत मिळवू शकतात. या पोर्टलवर एक फोर्म दिलेला आहे जो पूर्णपणे भरून सबमिट केल्यानंतर रक्कम पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल.