Sahara India Case । आपल्या देशात काही व्यवसाय असे आहेत ज्यांची संकटे काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. यात एक म्हणजे प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी आणि त्यांच्या नंतर आता सहारा इंडिया या कंपनीच्या नावे सुरु झालेली संकटांची शृंखला संपत नाहीये. सहारा इंडियाची सोपी ओळख सांगायची म्हणजे आपल्या भारतीय क्रिकेट संघाची जुनी जर्सी आठवून पहा, ज्यावर सहारा असा लोगो दिसेल. या कंपनीच्या मालकाचे म्हणजेच सुब्रत रॉय यांचे दुखद निधन झाल्यामुळे आता कंपनीसाठी कष्ट आणि चिंता वाढली आहे. काय आहे सहारा इंडिया बद्दल नवीन बातमी जाणून घेऊया…
सुब्रत रॉय यांच्या नंतर सहारा धोक्यात: (Sahara India Case)
सुब्रत रॉय यांची प्रसिद्ध कंपनी म्हणजे सहारा इंडिया, या कंपनीने गुंतवणूकदरांचे पैसे परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. याच आरोपाखाली सुब्रत रॉय यांनी जेलची हवा देखील चाखून बघितली होती.. गेल्या काही दिवसांपासून आजाराशी दोन हात करणाऱ्या रॉय या कंपनी मालकाचे निधन झाले आणि त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे. सध्या त्याच्या पश्चात परिवार मासिडोनिया येथे स्थायिक असून विदेशात सहारा इंडियाचा व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या मार्गावर आहे.
भारतात Securities and Exchange Board of India कडून सध्या या प्रकरणाचा तपास (Sahara India Case).सुरु आहे. या विभागाच्या प्रमुख माधवी पुरी-बुच यांनी सदर प्रकारची माहिती देताना स्पष्ट केले कि 1 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायालायातून सहारा इंडियाला कोणतीही दया दाखवण्यात आलेली नसल्यामुळे अजूनही प्रकरणाचा तपास सुरु आहे. रॉय यांच्या मृत्यूनंतर, माधवी पुरी-बुच यांनी सांगितले की भांडवली बाजार नियामक समूहाविरुद्धचा खटला सुरूच राहील. सेबीसाठी ही बाब एखाद्या संस्थेच्या वर्तनाबद्दल आहे आणि सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाल्याचे निदर्शनास आणून दाखवले तरीही त्याचा संबंध तपासाशी जुळत नाही कारण ते बरेच दिवस आजारी होते आणि म्हणून तपासात कोताही बदल केला जाणार नाही.