Sahara Refund Update : मोदी सरकार काय करणार 25000 कोटी रुपये?

बिझनेसनामा ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून देशात सहारा इंडियाबद्दल देशभरात कुजबुज सुरु आहे. असंही म्हटलं जातंय कि देशाच्या संपत्तीला सहारा कडून परत मिळवलेल्या पैश्यांमुळे भरपूर मदत होणार आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरु आहे आणि अश्यातच कंपनीच्या मालकाचे म्हणजेच सुब्रत रॉय यांचे निधन झाल्यामुळे सहारा कंपनीची परिस्थती अजून बिकट झाली आहे. सध्या परत मिळवलेली रक्कम पुन्हा एकदा गुंतवणूकदारांकडे पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु असून या संधर्बात कोणती नवीन बातमी ( Sahara Refund Update) समोर आली आहे जाणून घेऊया…

सहाराकडून मिळालेला पैसा काय करणार?(Sahara Refund Update)

सध्या सरकार सहारा कंपनीकडून गुंतवणूकदरांचा पैसा परत मिळवण्याच्या मोहिमेवर कार्यरत आहे. असं म्हटलं जातंय कि सरकारकडून लवकरच एक वेगळा फंड तयार करून त्यात वसुलीची हि रक्कम जमा केली जाईल. तसेच SEBI ने सहारा कडून वसूल केलेली रक्कम सरकारच्या कान्सोलीडेटेड फंडमध्ये ठेवली जाऊ शकते. मात्र यात अजून थोडा वेळ जाण्याची शक्यता आहे कारण सहारा कंपनीकडून अजून पूर्णपणे सर्व रक्कमेची परतफेड केली गेलेली नाही.

हा फंड तयार करण्यामागे सरकारचा एकमेव उद्देश हाच आहे कि कंपनीसोबत पैसे अडकून राहिलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा. पण जो पैसा निनावी राहील किंवा ज्यावर कोणीही आपला हक्क सांगणार नाही ती रक्कम मात्र नंतर सरकारकडून गरीब कल्याण योजनेत वापरली जाऊ शकते (Sahara Refund Update). मात्र सेबीने हि रक्कम तातडीने सरकारजमा करण्याची घाई करू नये कारण अजूनही गुंतवणूकदार पोर्टलचा वापर करून आपले पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आत्तापर्यंत सहारा इंडिया कंपनीकडून जवळपास 25 हजार कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत आणि यांपैकी 138 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आले असून, पैश्यांची परतफेड करण्यासठी सरकारने एका ऑनलाईन पोर्टलची सुविधा सुरु केली आहे. मात्र काही काळानंतर ज्या पैश्यांना कोणीही वाली नसेल अशी रक्कम सरकारजमा करण्यात यावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.