Sam Altman Return Open AI : Open AI मध्ये परतणार ChatGPT चे जनक; सॅम अल्टमन समोर कंपनीची हार

Sam Altman Return Open AI : ChatGPT हे नाव ऐकलं नाही असा माणूस आजच्या काळात शोधून सापडणार नाही. अगदी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते मोठमोठाल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत जगभरातील माहिती काही मिनिटात पोहोचवण्याचं काम जर का कोणी करत असेल तर ते म्हणजे ChatGPT . आजकाल या जगात अनेक मोठमोठाले तांत्रिक बदल होत आहेत, ज्यांमुळे सामान्य लोकांचं आयुष्य मोठ्या प्रमाणात सुधारताना आणि सोपं होताना दिसतंय. मात्र ChatGPTची निर्मिती करून तांत्रिक जगात भली मोठी क्रांती घडवणारा व्यक्ती हे कोण तुम्हाला माहित आहेत का? सेम अल्टमन. OpenAI कंपनीमध्ये सह संस्थापक आणि सीईओ म्हणून काम करणारे सेम अल्टमन यांना अचानक कंपनीतून काढून टाकण्यात आलं आणि म्हणूनच आठवड्याभरापासून कंपनीच्या नावाचा बोलबाला सर्वत्र सुरू आहे, पण आता सॅम अल्टमन पुन्हा एकदा कंपनी मध्ये परतणार आहेत.

सेम अल्टमन पुन्हा एकदा कंपनीत रुजू होणार – Sam Altman Return Open AI

ChatGPT जगासमोर आणल्यानंतर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जगभरात राज्य करायला सुरुवात केली आणि म्हणूनच OpenAI या कंपनीचं नाव सर्वत्र होऊ लागलं. मात्र ChatGPTचे सूत्रधार सेम अल्टमन यांची कंपनीतून अचानक हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतर मागोमाग कंपनीचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक रॅक ब्रोकमन आणि तीन वरिष्ठ संशोधकांनी कंपनीचा राजीनामा दिला. मात्र आज समोर आलेली बातमी हि सर्व प्रकरणाला वेगळी कलाटणी देणारी आहे कारण आता सेम अल्टमन हे काही काळातच पुन्हा एकदा कंपनीत रुजू होण्याची (Sam Altman Return Open AI) शक्यता आहे. सेम अल्टमन यांच्या परत रुजू होण्यावर कंपनीने एक पोस्ट शेअर केली, ज्यात कंपनी म्हणते की 22 नोव्हेंबर रोजी बोर्डचे सदस्य आणि अल्टमन यांच्यात चर्चा झाली आणि चर्चेच्या शेवटी अल्टमन पुन्हा एकदा सीईओ म्हणून परत रुजू होण्याचा करार निश्चित झाला आहे.

सेम अल्टमन सुरु करणार का नवीन कंपनी?

अल्टमन यांच्या कंपनीत परत येण्याबरोबरच बाकी महत्त्वाच्या पदांवर ब्रेड टेलर, लोरी समर्स, ॲडम डीअँजेलो यांची निवड करण्यात आली आहे, या मोठमोठाल्या नावांसोबतच कंपनी आता एक नवीन टीम तयार करण्याच्या मार्गावर आहे. OpenAI कंपनीचे दुसरे संस्थापक म्हणजे ग्रेक ब्रोकमन हेही आता पुन्हा एकदा कंपनीत रुजू होणार असल्याची पोस्ट समोर आली आहे.

अलीकडच्या काळात सेम अल्टमन नवीन आर्टिफिशल इंटेलिजन्सची कंपनी सुरू करण्याचा विचार करत आहेत असंही म्हटलं जातं होतं पण याबद्दल त्यांनी स्वतः कोणतीही माहिती माध्यमांना दिली नसल्यामुळे यावर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. सेम अल्टमन OpenAI मधील त्यांच्या विश्वासू लोकांशी आणि संशोधनकारांशी नवीन कंपनी सुरू करण्याबाबत चर्चा करत होते अशा बातम्या समोर येत होत्या, पण आज ते OpenAI मध्येच पुन्हा रुजू होत असल्याने पोकळ चर्चांना काहीच अर्थ राहिलेला नाही.