Satya Nadella Success Story: सामान्य घरातील मुलगा बनलाय Microsoft चा चेअरमन; सत्य नाडेला यांचा जीवनप्रवास माहितेय का?

Satya Nadella Success Story: भांडवलाच्या आधारे जगभरात मायक्रोसॉफ्ट ही दुसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून प्रसिद्ध झाली आहे. अनेक तरुणांना मायक्रोसॉफ्ट मध्ये नोकरी मिळवणं हे कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नाही.तुम्हाला माहितीच असेल कि विश्वभरात नावाजलेली ही कंपनी एका भारतीय माणसाकडून चालवली जाते. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला हे भारतीय वंशाचे आहेत व गेल्या वर्षी CNN बिझनेस कडून त्यांना CEO Of The Year म्हणून निवडले होते. कधीकाळी इंजिनियर म्हणून मायक्रोसॉफ्ट शी जोडल्या गेलेल्या सत्या नडेला यांनी आज कंपनीच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आपल्या आजूबाजूला अनेक माणसांनी नेहमीच मेहनत घेत इतरांपेक्षा वेगळा आविष्कार करून दाखवतात. सामान्य माणसांनी केलेल्या ह्या असामान्य कार्यामुळेच ते अनेकांसाठी आदर्श ठरतात. सत्या नडेला हे देखील याच मेहनती माणसांपैकी एक आहेत. मात्र कधी तुम्ही त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?

हैदराबाद मध्ये झाला होता जन्म:

आज जगभरातील लोकं ज्या मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये नोकरी मिळावी म्हणून धडपड करतात त्या कंपनीचे चेअरमन हे एक भारतीय आहेत. भारत देशाचे नागरिक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकालाच नडेला यांच्या कर्तृत्वाचा अभिमान असला पाहिजे(Satya Nadella Success Story). सत्या नडेला यांचा जन्म हैदराबाद मध्ये वर्ष 1967 मध्ये झाला. त्यांचे वडील हे एक प्रशासकीय अधिकारी होते तर आई हे संस्कृतची प्राध्यापिका होती. हैदराबाद मधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी वर्ष 1988 मध्ये मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग( Electronic Engineering)ची पदवी मिळवली आणि त्यानंतर कम्प्युटर सायन्स(Computer Science) मधून एमएस(MS) चे शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेत येऊन दाखल झाले. पुढे सत्य नडेला यांनी 1996 मध्ये शिकागो मधील बूथ स्कूल ऑफ बिझनेस(Booth School Of Business) मधून एमबीएचे(MBA) शिक्षण देखील पूर्ण केले.

असा होता मायक्रोसॉफ्टच्या चेअरमनचा प्रवास:(Satya Nadella Success Story)

आज पर्यंत प्रयत्न केल्याशिवाय यश हे कुणालाही मिळालेलं नाही आणि सत्या नडेला हे देखील त्याला अपवाद नाहीत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सत्या नडेला यांनी मायक्रो सिस्टम या कंपनीत तंत्रज्ञान विभागात नोकरी सुरू केली. वर्ष 1992 मध्ये ते मायक्रोसॉफ्ट मध्ये रुजू झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत मायक्रोसॉफ्ट शी जोडल्या गेलेल्या नडेला यांनी कंपनीच्या विविध प्रकल्पात काम केलेलं आहे(Satya Nadella Success Story). यामध्ये सॉफ्टवेअर विभाग, ऑनलाईन सेवा, संशोधन आणि विकास, जाहिरात अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश होतो.

भारतातील एका शहरामधून नशीब आजमावायला परदेशात गेलेल्या सत्या नडेला यांना आज क्लाऊड गुरु म्हणून ओळखलं जातं. मायक्रोसॉफ्ट मध्ये त्यांनी क्लाऊड कम्प्युटिंग चे नेतृत्व केले होते. आज जगभरातील सर्वात मोठे क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यात या भारतीयाचा सर्वात मोठा वाटा होता. सध्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे डेटाबेस, विंडोज सर्वर आणि डेव्हलपर्सला मायक्रोसॉफ्ट अज्योर क्लाऊड प्लॅटफॉर्मवर आणण्यात मोठी भूमिका निभावली होती.