Saudi Arabia Invest in IPL : IPL म्हणजे भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा… दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या IPL कडे भारतीय क्रिकेटप्रेमी डोळे लावूनच बसलेले असतात. देश विदेशातून अनेक क्रिकेटप्रेमी या दरम्यान भारतात येऊन आपल्या मनपसंत टीमला प्रोत्साहन देतात, अनेकवेळा खेळाडू सुद्धा इतर कुठल्याही देशांतील सामन्यांपेक्षा IPLला फार महत्व देतात, हीच आपल्या IPLची खासियत आहे. वर्ष 2008 मध्ये याची सुरुवात झाली होती आणि आजपर्यंत अविरतपणे हा प्रवास सुरु आहे. हा प्रवास रंजक आणि आकर्षक होण्यासाठी गुंतवणूकदार महत्वाचे असतात. या महामुकाबल्यात देशातीलच नाही तर विदेशी गुंतवणूकदार रक्कम मोजतात आणि आता यात अजून एक भर पडली आहे ती कोणाची हे पाहूयात..
सौदी अरेबिया IPL मध्ये गुंतवणूक करणार: Saudi Arabia Invest in IPL
IPL हे गुंतवणूकदारांशिवाय शक्य नाही आणि आता आपल्याला अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे कारण सौदी अरेबिया या वर्षापासून IPL मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. हा देश तब्बल 30 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि जर का हे खरं झालं तर IPLचा दर्ज्या वाढण्यासाठी भरपूर मदत होणार आहे. भारतीय क्रिकेट परिषद देखील या करारामुळे खुश आहे.
IPLची ख्याती सर्वदूर आहे त्यात कुणाचेही दुमत नाही. इथे चालणारी पैश्यांची उलाढाल यामुळे अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यात इच्छुक असतात. सौदी अरेबिया हि त्यातीलच एक आहे. भारताला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत कारण या आधी सौदीने अनेक खेळांमध्ये गुंतवणूक (Saudi Arabia Invest in IPL) करून त्यांचा दर्ज्या वाढायला मदत केली होती. आत्ता सध्या IPL बद्दल बोलायचं झालं तर 15 नोव्हेंबर पर्यंत सर्व गटांना आपल्या खेळाडूंची यादी प्रसिद्ध करायची आहे आणि यानंतर राहिलेल्या खेळाडूंचे ऑकशन केले जाईल.