बिझनेसनामा ऑनलाईन (Saving Account) | सध्या ऑनलाईन बँकिंगचे जग सुरू असून प्रत्येक घरातील व्यक्तींचे बँकेमध्ये अकाउंट आहे. त्याचबरोबर मोदी सरकार आल्यानंतर जनधन योजना, किसान पीएम योजना अशा बऱ्याच योजनेसाठी नागरिकांकडून बँक अकाउंट बनवून घेण्यात आले आहेत. त्यामुळे देशात 95 टक्के ग्राहकांकडे स्वतःचे बँक अकाउंट आहे. त्याचबरोबर बँक अकाउंटचे वेगवेगळे प्रकार आहे. त्यामध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट, जॉईंट अकाउंट यांचा समावेश होतो. पण बऱ्याचदा सेविंग अकाउंट जास्त प्रमाणात लोकांकडे असते. आपण सेविंग अकाउंट मध्ये किती पैसे जमा करू शकतो? त्यावर काही लिमिट असते का जर असेल तर ते किती? त्याचबरोबर यावर काही टॅक्स द्यावा लागतो का? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या डोक्यात येत असतात.
सध्या डिजिटल बँकिंगचं जग असून बऱ्याचदा सेविंग अकाउंट मधून मोठ्या प्रमाणात ट्रांजेक्शन केले जातात. त्याचबरोबर सेविंग अकाउंट मध्ये किती पैसे जमा करू शकतो हा प्रश्न पडणे साहजिक आहे परंतु यासाठी कोणतीही लिमिट ठेवण्यात आलेली नसून तुम्ही सेविंग अकाउंट मध्ये तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवू शकतात. पण जर सेविंग अकाउंट मध्ये जमा केलेले पैसे आईटीआर च्या कक्षेत येत असतील तर तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागते. आयकर विभागामार्फत कॅश डिपॉझिट वर सतत लक्ष ठेवले जाते. त्याचबरोबर विनाकारण अडचण होऊ नये यासाठी नियमित मर्यादा जाणून घेणे गरजेचे आहे.
यामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस ने आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढणाऱ्यांची तक्रार करणे बंधनकारक केले आहे. या कायद्यानुसार अकाउंटची माहिती द्यावी लागते. ही लिमिट एकाधित अकाउंट मध्ये लागू करण्यात आली असून आर्थिक वर्षात दहा लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कॅश जमा केल्यावर केली जाते. ज्याचा एकाच व्यक्तीला किंवा कॉर्पोरेशनला फायदा होतो. त्याचबरोबर हा नियम फक्त सेविंग किंवा करंट अकाउंट साठी नसून FD, म्युच्युअल फंड, शेअर, ट्रॅव्हल्स चेक, फॉरेक्स कार्ड यासाठी देखील लागू आहे.