Saving Tips For New Year : नव्या वर्षात पैशाची बचत करायचीय? तर मग फॉलो करा ‘या’ टिप्स

Saving Tips For New Year : नवीन वर्षासाठी उत्सुक आहात ना? नक्कीच असाल कारण नवीन वर्ष म्हटलं कि नवे संकल्प, नवीन विचार तयार हे आपोआपच तयार केले जातात. मागच्या वर्षात ज्या महत्वाच्या गोष्टी अपूर्ण राहिल्या त्या सर्व पूर्ण करण्यासाठी एक वेगळी संधी म्हणून नवीन वर्षाकडे पाहिलं जातं. नवीन वर्षात जागतिक महागाई कामी होईल कि नाही याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही मग अश्यावेळी आपण काय करावं? तर पैश्यांचं योग्य नियोजन. नियोजन हे कोणत्याही बाबतीत फारच महत्वाचं आहे. नियोजनाशिवाय मोठमोठाले निर्णय फसू शकतात आणि परिणामी डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. प्रत्येक माणसाने म्हणूनच नियोजन करणे महत्वाचे. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही तुम्हाला पैश्यांचे नियोजन आणि गुंतवणूक यांबद्दल काही गोष्टी सुचवणार आहोत, त्यामुळे नक्कीच हि बातमी शेवटपर्यंत वाचा..

नवीन वर्षात करा पैश्यांची योग्य गुंतवणूक:

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही उमेदीसह सज्ज असलाच. मात्र यात पैश्यांचे नियोजन आणि गुंतवणूक हा देखील एक महत्वाचा घटक ठरतो ज्याकडे दुर्लक्ष्य केले जाऊ शकत नाही. आपण नेहमीच कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करतो. योग्य ठिकाणी गुंतवणूक म्हणजे काय? तर, जिथून सर्वात अधिक रिटर्न मिळेल अश्या जागी पैश्यांची केलेली गुंतवणूक. आता अवघ्या चार दिवसांत आपण नवीन वर्षात पदार्पण करू. गेल्या वर्षांत जे आर्थिक नुकसान झालं असेल ते विसरून, त्याच चुका पुन्हा न करता वाटचाल करणे यालाच आपण नवीन वर्षाचं एक रेसोलुशन म्हणूयात (Saving Tips For New Year).

आत्ताच्या जगात कधी आणि कश्या प्रकारची आर्थिक समस्या उद्धभवेल याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याजवळ एक रक्कम कायम अश्या कठीण प्रसंगांसाठी जपून ठेवलेली असायला हवी, याला आपण स्मॉल सेविंग्स असेही म्हणू शकता. आर्थिक नुकसानीपासून सावध राहायचं असेल तर पैसे गुंतवणे हा एकाच पर्याय नाही, तर त्याहूनही पैश्यांचे योग्य नियोजन करणे अधिक महत्वाचा घटक आहे. अचानक ओढवलेल्या बिकट परिस्थितींमुळे तुमची आर्थिक परिस्थिती कोलमडून पडू शकते आणि अश्यावेळी गरज भासते ती योग्य नियोजनाची.

पैश्यांची गुंतवणूक कशी करावी? (Saving Tips For New Year)

सामान्यतः आपण बँक मध्ये FD किंवा पोस्ट ऑफिस PPF सेवेंचा वापर करत पैश्यांची गुंतवणूक करत असतो. मात्र इथे मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजनांवर एकाच प्रकारचा रिटर्न दिला जातो. महागाईचा सामना करण्यासाठी आपण सर्वाधिक लक्ष्य हे मोठ्या रिटर्नवर केंद्रित केलं पाहिजे. अधिक रिटर्न कोण देतं? SIP, म्युच्युअल फंड आजकाल सर्वाधिक लोकप्रियता मिळवत आहे. बाजारातील तंज्ञानाच्या मते इथे मिळणारा दीर्घकालीन परतावा आपल्या फायद्याचा ठरतो. जर का तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्या कंपनीबद्दल सविस्तर माहिती मिळवा, याआधी त्यांनी किती गुंतवणूकदारांना कश्या प्रकारचा परतावा दिलाय याची माहिती मिळवा.

तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर एकाच कानमंत्र पाळावा लागेल तो म्हणजे “वाढत्या महागाईशी दोन हात करू शकणारी गुंतवणूक करणे”(Saving Tips For New Year). जगभरात महागाई ज्या तेजीने वाढत आहे त्याच तेजीत तुम्ही पैश्यांचे नियोजन केले पाहिजे. तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणुकीची सुरुवात कराल, तेवढ्याच लवकर तुम्हाला परतावा मिळेल. पैश्यांचे नियोजन करताना कुठे पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे हे जाणून घ्या, काही ठिकाणी अवाढव्य खर्च होत असेल असं वाटतंय तर वेळेतच त्यावर त्यावर आळा घाला. एखादवेळेस केलेलं नियोजन तुमच्या फायद्याचे ठरत नसेल तर त्यामागची करणं जाणून घेत आवश्यक बदल करा.