SBFC Finance IPO । इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॉन बँकिंग फायनान्स कंपनी SBFC Finances limited चा IPO या आठवड्यात गुरुवारी, 3 ऑगस्ट रोजी उघडणार आहे. तर 7 ऑगस्ट रोजी बंद होईल. कंपनी या IPO च्या माध्यमातून 1025 कोटी रुपये उभारण्याच्या विचारात आहे, त्यामुळे तुम्हीही या IPO साठी पैसे तयार ठेवा. आणि लाभ घ्या.
SBFC Finances limited या कंपनीचा आयपीओ गुरुवारी म्हणजे तीन ऑगस्ट पासून गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात येणार आहे. यामध्ये 600 कोटी किमतीचे नवीन इक्विटी शेअर जारी करणार असून कंपनीच्या आयपीओची एकूण ऑफर साईझ 1,025 कोटी रुपये आहे. यासोबतच आयपीओमध्ये (SBFC Finance IPO) ऑफर फॉर सेल साठी 425 करोड रुपये शेअर्स कंपनीच्या प्रमोटर द्वारे विकले जातील आणि फ्रेश इशू मधून मिळणारे पैसे कंपनी भांडवल वाढवण्यासाठी आणि भविष्यातील काही गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. SBFC Finances limited कंपनीच्या आयपीओ क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्ससाठी 50 टक्के हिस्सा रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर 35 टक्के हिस्सा हा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी तर 15 टक्के हिस्सा नॉन इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे.
SBFC Finances limited च्या आयपीओसाठी 2 ऑगस्ट रोजी अँकर गुंतवणूकदारांना एलोकेशन करण्यात येणार असून 7 ऑगस्ट रोजी इशू बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी शेअर्सचे वाटप करण्यात येणार आहे. तर 14 ऑगस्ट रोजी शेअर खात्यात जमा केले जातील. 11 ऑगस्ट पर्यंत ज्या व्यक्तींना शेअर्स मिळालेले नाही त्यांच्या खात्यात रिफंड जमा करण्यात येणार आहे. आणि मग 16 ऑगस्ट रोजी BSE आणि NSE वर कंपनीच्या शेअरचे लिस्टिंग करण्यात येईल.
54 ते 57 रुपये प्राईझ बँड – SBFC Finance IPO
SBFC Finances limited या कंपनीने आपल्या IPO ची प्राईझ बँड 54 ते 57 रुपयांपर्यंत फिक्स केलेली आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी एक लॉट म्हणजे 260 शेअर साठी एप्लीकेशन द्यावे लागेल. म्हणजेच जर एखादा गुंतवणूकदार आयपीओसाठी अपर प्राईज ब्रँड 57 रुपयाचा हिशोबाने 260 शेअर्सच्या एका लॉटसाठी एप्लीकेशन देत असेल तर त्याला गुंतवणूक म्हणून 14,820 रुपये भरावे लागतील. तसेच जास्तीत जास्त असे 13 लॉट तुम्ही खरेदी करू शकता, त्यासाठी गुंतवणूकदाराकडे 1,92,660 रुपये असायला हवेत