SBI Account Balance Check : SBI ग्राहकांनो, घरबसल्या अशाप्रकारे चेक करा तुमच्या खात्यावरील रक्कम

SBI Account Balance Check : देशभरात स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकवर्ग सर्वाधिक आहे. आणि हा ग्राहक वर्ग दिवसेंदिवस वाढत जाण्यासाठी बँक नवनवीन योजना राबवत असते. त्याबरोबरच आता जगभरात टेक्नॉलॉजीचे प्रमाण वाढत चालल्यामुळे बँकिंग क्षेत्रात देखील यामुळे विशेष प्रगती झालेली पाहायला मिळते. आता छोट्या मोठ्या घडामोडींसाठी बँकेत जाण्याची गरज उरलेली नाही. घरबसल्याच मोबाईल बँकिंग आणि ऑनलाईन पेमेंटचा वापर करून अधिकाधिक कामं साध्य करता येतात. SBI कडून आणलेल्या या नवीन सुविधेचा वापर करून तुम्ही घरबसल्याच खात्यातली रक्कम म्हणजेच बँक बॅलन्स तपासू शकता. यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे ते जाणून घेऊयात.

बँक बॅलेन्स चेक करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध –

ग्राहकांसाठी बँकिंगची काम सोपी व्हावीत म्हणून SBIने घरबसल्या इंटरनेटच्या सहाय्याने खात्यातली रक्कम तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वर्ष 1955 पासून भारतात कार्यरत असणाऱ्या या बँकेचे मुख्यालय मुंबई शहरात आहे. आणि याशिवाय बँकेच्या 16 हजार पेक्षा अधिक शाखा देशाच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये पसरलेल्या आहेत. इतर बँकांप्रमाणेच तुम्ही जर का स्टेट बँकचे ग्राहक असाल तर घरबसल्या खात्यातले रक्कम तपासता येते (SBI Account Balance Check) ती कशी हे जाणून घेऊया. खात्यातील रक्कम तपासण्यासाठी विशेषतः टोल फ्री नंबर, SMS बँकिंग, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि ATM अशा पर्यायांचा समावेश केला जातो

घरबसल्या खात्यातील रक्कम कशी तपासावी (SBI Account Balance Check)

तुम्ही जर का SBI चे ग्राहक असाल तर SMS बँकिंगच्याद्वारे खात्यातली रक्कम तपासता येते. बँक कडून मनी स्टेटमेंट किंवा बॅलन्स डिटेल तुमच्या अधिकृत मोबाईल नंबरवर पाठवले जातात. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वरून SBI बॅलन्स इन्क्वायरी (SBI Balance Enquiry) नंबरवर एक मिस्ड कॉल किंवा SMS पाठवावा लागतो आणि त्यानंतर काही काळातच तुमच्या मोबाईलवर खात्याबद्दल सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाते. तुम्हाला जर घरबसल्या SMS द्वारे बँक खात्यातली रक्कम (SBI Account Balance Check) तपासायची असेल तर रजिस्टर नंबर द्वारे 092-237-66666 या नंबरवर “BAL” असा SMS पाठवू शकता. तसेच मिनी स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी 0922-386-666 क्रमांकावर “MSTMT” असा SMS करावा लागतो.

नेट बँकिंग हा आजच्या जगात सर्वात सोपा समजला जाणारा एक पर्याय आहे आणि SBI चे ग्राहक घरबसल्या नेट बँकिंगच्या पर्यायाचा वापर करू शकतात. यासाठी सर्वात आधी तुम्हाला SBI च्या एपवर स्वतःला रजिस्टर करावे लागेल त्यानंतर या नवीन अकाउंट मध्ये लॉगिन करून तुम्ही आवश्यक असलेली सर्व माहिती मिळवू शकता.