SBI चा ग्राहकांना अलर्ट!! आजच बँकेत जाऊन ‘या’ कागदावर सही करा

बिजनेसनामा ऑनलाइन । देशातील सर्वात मोठी खास क्षेत्रातील बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक मेसेज दिलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने बँकेतील लॉकर होल्डर्सला बँकेच्या ब्रांच मध्ये येऊन नवीन लॉकर एग्रीमेंट नोटीस वाचून साइन करण्याचे आवाहन दिले आहे. ज्यामुळे बँकेत संबंधित कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. याबाबत बँकेने रिवाईज लॉकर एग्रीमेंट साठी ट्विट करून माहिती दिली. बँकेने लवकरच याबाबत नवीन सुधारित नियम लागू केले आहे. यासाठी बँकेकडून 30 सप्टेंबर पर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे एसबीआय बँकेने लवकर कॉन्ट्रॅक्ट अपडेट करण्यास सांगितले आहे.

त्याचबरोबर नवीन लॉकर कॉन्ट्रॅक्ट मध्ये पात्रता आणि नूतनीकरणासाठी कॉन्ट्रॅक्टवर साइन करणे आवश्यक आहे. आरबीआय ने सर्व बँकांना 30 जून पर्यंत नवीन लॉकर कॉन्ट्रॅक्ट करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर 30 सप्टेंबर पर्यंत 75% लोकांनी आणि 31 डिसेंबर पर्यंत 100 टक्के लोकांनी कॉन्ट्रॅक्ट साइन करणे गरजेचे आहे.

लॉकर घेणाऱ्या ग्राहकांच्या वाढत्या तक्रारीमुळे आरबीआय ने नवीन नियमावली जारी केली. ही नियमावली ग्राहकांच्या हिताची असून आता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची जबाबदारी आमची नसल्याचं बँकेकडून सांगण्यात येणार नाही. जर चोरी, फसवणूक, आग किंवा इमारत कोसळल्यास लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 टक्के बँकांचे दायित्व असेल. म्हणजेच सुरक्षेसाठी बँकांना आता संपूर्ण मेहनत घ्यावी लागेल. त्याचबरोबर जेव्हा ग्राहक लॉकर एक्सेस करतील तेव्हा बँकेच्या माध्यमातून ई-मेल किंवा एसएमएस द्वारे माहिती दिली जाईल. त्याचबरोबर लॉकर रूममध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांवर सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवले जाईल.

या किमतीमध्ये तुम्ही एसबीआय मध्ये लॉकर ओपन करू शकता

जर तुम्ही शहरी भागात छोटं लॉकर ओपन करणार असाल तर तुम्हाला 2000 आणि त्यावर जीएसटी द्यावा लागेल. जर तुम्ही मिडीयम साईज लॉकर सुविधा घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला 4000 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल. एसबीआयचं मोठं लॉकर तुम्ही 8000 रूपये आणि त्यावर जीएसटी शुल्कासह सुरू करू शकतात. एसबीआयच्या सर्वात मोठ्या लॉकर साठी 12000 आणि जीएसटी द्यावा लागेल.

त्याचबरोबर जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये लॉकर ओपन करणार असाल तर तुम्हाला 1500 आणि जीएसटी द्यावा लागेल. तर मीडियम साईज लॉकर 3000 रुपये आणि जीएसटीवर उपलब्ध आहे. मोठा लॉकर 6000 रुपये शुल्क आणि जीएसटीवर देण्यात येते. तर छोट्या शहरातील सर्वांत मोठा लॉकर 9000 रुपये आणि जीएसटी वर उपलब्ध आहे.