SBI Amrit Kalash FD Scheme । आज-काल प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पैशाची गुंतवणूक करत असतो. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे बऱ्याच जणांना महिन्याच्या खर्चामधून सेविंग करणे जमत नाही. तरीही ते छोटी मोठी का होईना एफडी तयार करून सेविंग करत असतात. तुम्ही देखील एखादी एफडी किंवा गुंतवणूक करू इच्छित असाल तर स्टेट बँकेने एक खास एफडी योजना तुमच्यासाठी आणली आहे. आणि ही योजना एका महिन्यामध्ये संपणार देखील आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा फायदा घेऊ शकता.
15 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत –
नुकतच स्टेट बँक ऑफ इंडियाने किरकोळ गुंतवणूकदारांना स्पेशल एफडी योजना आणली आहे. या योजनेचं नाव अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash FD Scheme) असं असून नुकतंच स्टेट बँक ऑफ इंडियाने या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. यात गुंतवणूकदारांना हमी आणि महत्वाचे म्हणजे चांगल्या प्रमाणात रिटर्न दिला जातोय. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची संधी मिळत आहे. या एफडी मध्ये बाकीच्या एफडी पेक्षा जास्त व्याजदर दिला जातोय. SBI च्या वेबसाईटनुसार, अमृत कलश एफडी स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकेने शेवटची तारीख 30 जून निश्चित केली होती. परंतु आता बँकेने गुंतवणुकीची तारीख ही 15 ऑगस्ट 2023 केली आहे.
किती व्याजदर मिळतो? (SBI Amrit Kalash FD Scheme)
SBI च्या अमृत कलश ही 400 दिवसांची एफडी असून ही एक खास रिटेल मुदत ठेव योजना आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60% आणि सर्वसामान्य नागरिकांना 7.1% व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची एफडी करू शकता. त्याचबरोबर अमृत कलश या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला, तीन महिन्याला आणि सहा महिन्याला व्याज दिले जाते. यासोबतच तुम्ही तुमच्या सोयीनुसार एफडी व्याजाचे पेमेंट देखील ठरवू शकतात. येव्हडच नव्हे तर FD च्या मॅच्युरिटी वर TDS कापून त्यावर व्याज ग्राहकांच्या खात्यामध्ये पाठवलं जाते आणि गुंतवणूकदार ITR नियमानुसार कर वजावटी पासून सूट मिळवण्यासाठी 15G आणि 15H हा फॉर्म भरू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अमृत कलर योजनेमध्ये (SBI Amrit Kalash FD Scheme) सर्वसामान्य नागरिकांसाठी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 3 ते 7 टक्के व्याजदर दिले जाते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 3.50 टक्के ते 7.50% टक्के व्याजदर दिल्या जाते. एसबीआयच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही नेट बँकिंग आणि एसबीआय युनो ॲपद्वारे अमृत कलश एफडी बुक करू शकतात. या स्पेशल कलश योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे 15 ऑगस्ट पर्यंत वेळ आहे. त्यामुळे आता अजून उशीर करू नका.