SBI Brand Ambassador : धोनी बनला SBI चा ब्रँड अँबेसिडर; मार्केटिंग आणि जाहिराती करणार

SBI Brand Ambassador : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) क्रिकेटमधून माघार घेल्यानंतर अनेक वर्ष उलटली आहेत तरीही काही लोकं आपली अशी काही छाप सोडून जातात कि त्यांच्यामागे ती ओळख आणि प्रतिष्ठा कायम राहते. आज देखील धोनीच्या चाहतावर्ग तेवढाच किंबहुना अधिकच आहे. याच चाहत्यांसाठी आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. महेंद्रसिंह धोनी हा देशातील प्रसिद्ध बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चा ब्रँड अँबेसिडर बनला आहे.

State Bank Of India आणि धोनी यांच्यात करार: SBI Brand Ambassador

देशातील एक प्रतिष्टीत बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. याच बँक कडून आता दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना आपले ब्रेंड एम्बेसेडर (SBI Brand Ambassador) म्हणून नियुक्त केले आहे. बँककडून हा निर्णय सर्वांसाठी जारी करण्यात आला, आता धोनी स्टेट बँकसाठी मार्केटिंग आणि जाहिराती करताना दिसेल. बँकचे पदाधिकारी या नियुक्तीवर अत्यंत खुश आहेत आणि त्यांना विश्वास आहे कि धोनीचा संयम बँकेला ग्राहक जोडण्यासाठी भरपूर मदत करणार आहे. महेंद्रसिंग धोनी चाहतावर्ग भला मोठा आहे आणि लोकं त्यांच्यावर विश्वास ठेवतात, याच परीनामार्थी बँकेला फायदा होणार आहे.

SBI आत्ताची सर्वोत्तम बँक:

सध्या स्टेट बँक हि देशातील सर्वोत्तम बँक म्हणून ओळखली जाते, देशभरात त्यांच्या 22,405 शाखा आहेत आणि 65,627 ATM चे नेटवर्क आहेत. तसेच ग्राहकांकडून या बँकवर सगळ्यात जास्ती विश्वास ठेवला आणि म्हणूनच बँक हि अनेक जणांना कर्ज देते, आजपर्यंत बँकने 30 लाखांपेक्षा जास्ती लोकांना गृह कर्ज देऊन त्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. स्टेट बँककडे 45.31लाख कोटी रुपयांची मोठी ठेव आहे. हा आकडा पाहून तुमच्या लक्ष्यात आलंच असेल हि स्टेट बँक हि देशातील सर्वाधिक वापरली जाणारी आणि विश्वास ठेवली जाणारी बँक आहे.