बिझनेसनामा ऑनलाईन । SBI कार्ड आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एसबीआय Rupay क्रेडिट कार्ड ला UPI सोबत लिंक करण्याची (SBI Card UPI Payment) घोषणा केली आहे. त्यानुसार Rupay क्रेडिट कार्डधारकाला 10 ऑगस्ट पासून UPI ट्रांजेक्शन करता येऊ शकते. एवढेच नाही तर तुम्ही UPI पेमेंट साठी कोणतेही थर्ड पार्टी ॲप वापरत असाल तर तुम्हाला SBI कार्ड वापरता येऊ शकते. या निर्णयामुळे याचा फायदा एसबीआय कार्डच्या रूपे क्रेडिट कार्ड यूजरसाठी होईल.
या नवीन सुविधेची माहिती देताना SBI Card चे MD आणि CEO राम मोहन राव अमारा यांनी सांगितलं की, SBI Card च्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना Rupay च्या माध्यमातून UPI पेमेंटची सेवा मिळेल. यामुळे पेमेंटसाठी युजर्स क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकतील. तसेच डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रामध्ये नवी क्रांती घडू शकते. UPI आणि SBI Card यांच्यातील ही पार्टनरशिप आता ग्राहकांना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करण्यासाठी (SBI Card UPI Payment) सक्षम बनवेल.
तर दुसरीकडे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (NPCI) सीईओ दिलीप असबे यांनी सांगितलं की, NPCI आणि एसबीआय कार्डच्या पार्टनरशिपनंतर युजर्स ला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून युपीआय पेमेंट करण्याचे ऑप्शन्स खुले करण्यात येतील. ही पद्धत अत्यंत सोपी असून यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही. त्याचबरोबर तुम्ही देखील क्रेडिट कार्ड सोबत यूपीआय लिंक करू इच्छित असाल तर तुमच्याकडे एसबीआय क्रेडिट कार्ड रजिस्टर नंबर यूपीआयला लिंक असणे गरजेचे आहे. याशिवाय कार्ड आणि यूपीआय लिंक होऊ शकणार नाही.
अशा पद्धतीने करा SBI कार्ड UPI सोबत लिंक-
1) यासाठी सर्वात अगोदर यूपीआय ॲप डाऊनलोड करा.
2) त्यानंतर मोबाईल नंबर च्या माध्यमातून यूपीआय अँप मध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
3) रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर add credit card किंवा link credit card हे ऑप्शन दिसतील.
4) यापैकी एका ऑप्शन वर क्लिक करा.
5) यानंतर SBI Rupay Credit card हे ऑप्शन निवडा.
6) या प्रोसेस नंतर तुम्हाला तुमच्या कार्डचे सहा डिजिट नंबर टाकावा लागेल.
7) यासोबतच एक्सपायरी डेट देखील टाका.
8) यानंतर तुमचे यूपीआय अँप एसबीआय कार्ड सोबत लिंक होईल.
या पद्धतीने करा पेमेंट– (SBI Card UPI Payment)
जर तुम्ही एसबीआय कार्डच्या माध्यमातून यूपीआय आपने पेमेंट करू इच्छित असाल तर
1) सर्वात पहिले क्यू आर कोड स्कॅन करा.
2) जेवढे पेमेंट करायचे आहे ते टाका
3) पेमेंट ऑप्शन मध्ये एसबीआय रुपये क्रेडिट कार्ड हे ऑप्शन निवडा.
4) यानंतर 6 डिजिट यूपीआय पिन टाका.
5) काही सेकंदात तुमचे पेमेंट होईल