SBI Chocolate Scheme : कर्ज वसुलीसाठी SBI ने लढवली युक्ती; ग्राहकांना चॉकलेट पाठवून आठवण करून देणार

SBI Chocolate Scheme । अनेक वेळा आपण पाहिलं असेल की लोकं बँक कडून कर्ज घेतात पण त्याची परतफेड मात्र वेळेत करत नाही. लोनची परतफेड न झाल्यास बँकेकडून गहाण ठेवलेल्या वस्तूंवर जप्ती आणली जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वपरिचित बँक, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank Of India) ने या समस्येवर तोडगा काढला आहे. एसबीआयचे अधिकारी हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांना आता चॉकलेट पाठवणार आहे. या सोबत त्यांना हप्ता भरण्याची आठवण देखील करून देणार आहेत.

नवीन कल्पनेवर काय बोलली SBI?

या नवीन कल्पनेवर बोलताना बँकेचे(SBI) कर्मचारी म्हणले की हल्ली कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड मात्र वेळेत केली जात नाही. बँककडून पुन्हा पुन्हा आठवणीचे फोन करूनही त्याला उत्तर मिळत नाही. आता हीच परीस्थिती बदलण्यासाठी बँकने हे नवीन पाऊल उचलेलं आहे. इथे बँककडून ग्राहकांना न सांगताच चोकॉलेटचं बॉक्स घेऊन त्याच्या घरी भेट देण्यात येईल.

का SBI ने सुरु केली ही पद्धत? SBI Chocolate Scheme

ग्राहक आणि बँक यांमधील संबंध सुधारणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. व्याजाचे दर आणि कर्जाची रक्कम दोन्ही दिवसेंदिवस वाढत असल्याने बँककडून हा निर्णय घेण्यात आला आहे. जून 2023, मध्ये बँकच्या रिटेल लोनची किंमत 12.04 लाख कोटी रुपये झाली होती, तर बँकेच्या एकूण कर्जाची रक्कम 33.03 लाख कोटी रुपये होती. जगात हप्ता वेळेवर न भरणारे अनेकजण असतात, त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचललं आहे.

या उपक्रमात बँक करणार AI चा उपयोग :

SBI चे MD अश्विन कुमार तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेत (SBI Chocolate Scheme) बँक AIचा वापर करणार आहे. बँक यामध्ये दोन फिनटेक कंपन्यांची मदत घेणार आहे. जे ग्राहक बँकेच्या कर्जाचे हप्ते पूर्ण भरत नाही अशा कर्जदाराला न कळवता बँकेचे अधिकारी त्यांच्या घरी थेट चॉकलेट घेऊन पोहचणार आहेत. .