बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक म्हणून प्रसिद्ध असलेली एसबीआय. स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाइन बँकिंग सुविधा सोबत अजून एक फीचर्स लॉन्च केले आहे. या फिचर नुसार तुम्ही SBI च्या अकाउंटवरून डायरेक्ट पेमेंट करू शकाल. रविवारी एसबीआय ने YONO ॲप अपडेट केले. या नवीन अपडेट मुळे आता पेमेंट करणे सहज सोपे झाले आहे. एसबीआय ने YONO अँपचे अपडेट व्हर्जन लॉन्च केल्यानंतर बँकेने यूपीआय पेमेंट मोड मध्ये वेगवेगळे फिचर्स ऍड केलेले आहे ज्यामुळे अँप वरून कोणालाही पैसे पाठवता येतील. त्याचबरोबर एसबीआय बँकेचे ग्राहक आता विना एटीएम पैसे काढू शकतील.
एसबीआय ने त्यांच्या ग्राहकांसाठी ICCW म्हणजेच इंटर ऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉ ही सिस्टम सुरू केली आहे. यासाठी ग्राहकांना बँकेचे UPI QR कॅश फीचर चा वापर करावा लागेल. म्हणजेच आता एसबीआयचे ग्राहक कार्ड न वापरता कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पैसे काढू शकतात. एसबीआय बँकेने ॲप अपडेट केल्यावर या ॲपचे नाव सुद्धा बदलून टाकले आहे. आता YONO अँप चं नाव योनो फॉर एव्हरी इंडियन असं झालं आहे. या अपडेट नुसार आता युनो ॲप वर कोणताही बँकेच्या ग्राहकांना स्कॅन अँड पे, पे बाय कॉन्ट्रॅक्टर्स, रिक्वेस्ट मनी कार्डलेस कॅश यासारखं फीचरचा आस्वाद घेता येणार आहे.
एसबीआय बँकेने 68 व्या बँक दिवसानिमित्त ही सुविधा ग्राहकांना दिली आहे. एसबीआय च्या योनो या अँप ची सुरुवात 2017 मध्ये झाली होती. एसबीआय बँकेने सांगितल्याप्रमाणे आता देशात योनो चे सहा करोड युजर्स आहे. त्याचबरोबर 2022 मध्ये 78.60 लाख लोकांनी युनो ॲप वरून डिजिटल सेविंग अकाउंट ओपन केले आहे.