बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या State Bank Of India कडून आपल्या खातेदारांसाठी वेळोवेळी नवनवीन ऑफर्स दिल्या जातात. यामुळे नवीन खातेधारकांना फायदा होतोच पण सोबतच बँकच्या ग्राहकांचा आकडा सुद्धा वाढतो. आणि लोकांच्या मनात बँकेबद्दल विश्वास निर्माण होतो. आता हल्लीच SBI कडून होम लोनवर (SBI Home Loan) विशेष सुट देऊ करण्यात आली आहे. बँकेने होम लोनच्या व्याजात 0.65% सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सगळीकडे सणासुदीची तयारी असून याच पार्श्वभूमीवर SBI ने ही ऑफर आणली आहे.
सध्या गणेशोत्सवाची तयारी सगळीकडे सुरु आहे. यंत्र दसरा, दिवाळी असे मोठे सण आहेत. या फेस्टिवल सीजनच्या सुरुवातीलाच SBI कडून ही सवलत देण्यात आली आहे. होम लोन वर मिळणाऱ्या discount ची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 अशी असणार आहे. परंतु SBI च्या होम लोणचं लाभ त्याच ग्राहकांना घेण्यात येईल ज्यांचा Cibil Score चांगला असेल.
Cibil Score म्हणजे काय?
कुठल्याही प्रकारचं कर्ज मिळवायचं असल्यास आपला Cibil Score चांगला असणं महत्वाचं आहे. Cibil Score म्हणजेच लोन (SBI Home Loan) घेणारा परतफेड करू शकेल की नाही याचा पुरावा होय. तुम्हाला लोन देऊ करत असताना बँक तुमचा Cibil Score तपासून पाहत असते. आधीच्या लोनची वेळेवर परतफेड झाली आहे की नाही याचा अंदाज घेत असते. Cibil Score ची मोजणी 300 ते 900 पॉईंट्सच्या आत केली जाते.
तुमचा Cibil Score खालील प्रमाणे असेल तर एवढा Discount मिळेल: SBI Home Loan
750-800 सिबिल स्कोअर
जर तुमचा सिबिल स्कोर 750-800 या दरम्यान असेल तर या ऑफर कालावधी दरम्यान होम लोनचा व्याजदर 8.60% आहे, ज्यावर तुम्हाला 0.55 टक्के सूट दिली जात आहे.
700- 749 सिबिल स्कोअर
जर तुमचा सिबिल स्कोर 700 ते 749 दरम्यान असेल तर SBI होम लोन डिस्काउंट ऑफर कालावधी दरम्यान तुम्हाला 8.7% व्याजदर पडेल. यामध्ये तुम्हाला 0.65% ची सूट देण्यात येईल.
550- 699 सिबिल स्कोअर
जर तुमचा सिबिल स्कोर 550- 699 या दरम्यान असेल तर मात्र तुम्हाला SBI कडून कोणतीही सूट देत नाही. अशावेळी तुम्हाला 9.45% आणि 9.65% व्याजदर आकारण्यात येईल.
151-200 सिबिल स्कोअर
151-200 पर्यंतच्या CIBIL स्कोअरसाठी, SBI ऑफर कालावधी दरम्यान 0.65 टक्के सूट देत आहे. ऑफर कालावधी दरम्यान प्रभावी दर 8.7% आहे
101-150 सिबिल स्कोअर
परंतु 101-150 पर्यंतच्या सिबिल स्कोअरसाठी, SBI कोणतीही सूट देत नाही. इथे तुम्हाला 9.45% व्याजदर बसेल.