SBI in Sri Lanka: तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशातील एका बँकने एका नवीन राष्ट्रात आपली शाखा सुरु केली आहे. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संदर्भांत माहिती दिली आहे. सीतारमण यांच्या हातूनच या बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन श्रीलंकेत झालं. हि बँक आणि कुठली नसून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आहे. स्टेट बँकला आपल्या देशात भरपूर ग्राहक वर्ग मिळाला आहे. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बँकच्या शाखा देशात सर्वत्र पाहायला मिळतात. आणि आता पाच शाखानंतर अजून एक नवीन देशात सहावी शाखा उघडणे हा बँकचा नवीन विक्रम म्हणावा लागेल.
श्रीलंकेत सुरु झाली स्टेट बँक: SBI in Sri Lanka
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेत स्टेट बँकचे उद्घाटन केले. त्रिनकोमाली या भागात बँकची नवीन शाखा सुरु करण्यात आली आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण स्टेट बँक हि श्रीलंकेमधल्या अनेक जुन्या बँकामधली एक आहे. आणि गेल्या 159 वर्षांपासुन कार्यरत आहेत. निर्मला सीतारमण या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या बँकेच्या शाखेचं उद्घाटन केलं. तसेच यावेळी त्यांनी बँकच्या ग्राहकांना नवीन पासबुक देऊ केले होते.
स्टेट बँकच्या एकूण पाच शाखा श्रीलंकेत काम करतात आणि याशिवाय नेट बँकिंगच्या मदतीने त्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करतात. श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात स्टेट बँकने भरपूर मदत देऊ केली आहे. आपल्याला माहितीच आहे कि गेल्या काही काळात श्रीलंका आर्थिक संकटांना तोंड देत होती, या कठीण प्रसंगी स्टेट बँकने (SBI in Sri Lanka) त्या देशाला 1 बिलियन डॉलर क्रेडीट लाईन उभी करायला मदत केली आहे. आता सुरु झालेली नवीन शाखा हि नक्कीच बँकेचा व्यवसाय समुद्रापार वाढवणार अशी अपेक्षा आहे.