SBI च्या ग्राहकांना मोठा झटका, व्याजदरात वाढ; तुमचा EMI किती वाढणार?

बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. SBI ने आपल्या MCLR रेट मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे बँकेच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. MCLR ची वाढ सर्व प्रकारच्या कर्जासाठी करण्यात आली आहे. यामुळे तुमची सर्व प्रकारची कर्जे, आणि EMI वर याचा परिणाम होणार आहे.

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 15 जुलैपासून MCLR चे नवे दर लागू होतील. या वाढीनंतर MCLR 8.55 टक्के झाला आहे, जो आधी 8.50 होता. एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ झाली असून अनुक्रमे 8 टक्के आणि 8.15 टक्के MCLR झाला आहे. आणि हाच रेट सहा महिन्यांसाठी MCLR 8.45 टक्के होणार आहे.

EMI वर काय परिणाम होणार ?

गृहकर्जासह विविध कर्जावरील व्याजदराची गणना करण्यासाठी बँका MCLR वापरतात. MCLR च्या वाढीनंतर ज्या कर्जदारांनी MCLR आधारित व्याजदरावर कर्ज घेतलं आहे. त्यांचा महिन्याचा हप्ता म्हणजेच EMI वाढणार आहे, त्यामुळे ग्राहकांना आर्थिक झळ ही सोसावी लागणार आहे. परंतु, इतर मानक व्याजदराने कर्ज घेतलेल्या कर्जदारांना यामुळे काही कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही.