SBI MCLR Rate : SBI च्या MCLR दरांत बदल; पहा काय आहेत नवीन रेट

बिझनेसनामा ऑनलाइन | देशातील सर्वात परिचित बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India). या बँकने आपल्या ग्राहकांसाठी खास खबर आणलेली आहे. SBI च्या MCLR दरात काही बदल केले असून 15 सप्टेंबर 2023 पासून हे नवे दर सर्वांसाठी लागू करण्यात आले आहेत. SBI कडून या दरांमध्ये काही विशेष बदल केलेले नाहीत. मात्र MCLR सोबत Price Landing Rate मध्ये थोडे बदल केलेले पाहायला मिळतात. या नंतर बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट 14.85% वरून वाढत 14.95% झाला आहे.

MCLR म्हणजे काय व त्याचा फायदा काय होतो?

MCLR (Marginal Cost of Funds based Lending Rate) बँक कडून एक इंटरस्ट रेट ठरवला जातो, हा रेट ठरवत असताना फंड कॉस्ट, ऑपरेटिंग फंड, प्रोफीट मर्जीन इत्यादी गोष्टीं लक्षात घेतल्या जातात . वेगवेगळ्या प्रकारची लोन देत असताना बँक MCLRचा वापर करते.

नवीन MCLR Rate(SBI MCLR Rate) काय आहे?

SBIच बेस लेंडिंग रेट हा 8 ते 8.75% आहे. तर ओवरनाईट MCLR रेट 8% आहे.

मुदत ( Tenor)Existing MCLR (%)Revised MCLR (%)
ओव्हर नाईट8.08.0
एक महिना8.158.15
तीन महिने8.158.15
सहा महिने8.458.45
एक वर्ष8.558.55
दोन वर्ष8.658.65
तीन वर्ष8.758.75

SBI BPLR

SBI ने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) प्रतिवर्ष 14.95% पर्यंत वाढवण्यात आला आहे. यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे जी 15 सप्टेंबर 2023 पासून लागू होणार आहे.

रिझर्व बँक कडून झालेल्या रेपो रेटच्या घोषणेनंतर, SBI ने आपल्या नवीन MCLR रेट जाहीर केले(SBI MCLR Rate). आजही रिझर्व बँकचा रेपो रेट न बलदता 6.5% एवढाच आहे. जून महिन्याच्या 8 ते 10 तारखेला रिझर्व बँकच्या मोनेटरी पोलीसीची बैठक झाली, ज्यात सलग तिसऱ्या वेळी रिझर्व बँकने व्याजदारांना विराम दिला आहे. तसेच आपला रेपो रेट 6.5% असाच कायम ठेवला आहे.