बिझनेसनामा ऑनलाईन । बँका प्रत्येकवेळी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक न अनेक योजना समोर आणत असतात. आपला ग्राहक वर्ग टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अश्या गोष्टी सातत्याने सुरु ठेवणं महत्वाचं आहे. देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील वेळोवेळी याचं पालन करताना दिसते, आता पुन्हा एकदा बँकेकडून ग्राहकांसाठी खास बातमी समोर आली आहे. SBI ने त्यांच्या ग्राहक सेवा केंद्र (CSP) एजंट्ससाठी एक नवीन ‘मोबाइल हँडहेल्ड डिव्हाइस’ SBI (Mobile Handheld Device) लाँच केले आहे. यामुळे ग्राहकांना आपली काही कामे घरबसल्या करता येणार आहेत.
स्टेट बँक कडून आणलेल्या नवीन सुविधेमुळे छोट्या छोट्या कामांसाठी बँकेत जाणायची गरज उरणार नाही. बँकची हि सुविधा थेट तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचेल आणि तुमची कामं सोपी करेल. बँकिंगच्या सुविधा घरून हाताळता याव्यात म्हणून SBI कडून मोबाईल हेन्डल्ड डीव्हाईसची (SBI Mobile Handheld Device) सुरुवात करण्यात आली आहे. हा डीव्हाईस हाताळायला फारच हलका आणि सोपा आहे, ज्याला तुम्ही अलगद उचलून दुसऱ्या जाग्यावर ठेऊ शकता.
घरबसल्या कोणकोणती कामे करता येणार? SBI Mobile Handheld Device
सध्या सुरवातीच्या टप्प्यात असताना हा डिव्हाईस चार प्रमुख गोष्टी करेल, ज्यात पैसे काढणे, पैसे जमा करणे, पैसे पाठवणे आणि खात्यातील रक्कम तपासणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.हा डिव्हाईस घेऊन सेवा केंद्राचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जातील व त्यांना हव्या असलेल्या सेवा उपलब्ध करवून देतील. लाभार्थी ग्राहकांमध्ये विशेषकरून जेष्ठ नागरिक, विकलांग,आणि आजारी लोकांचा समावेश होतो.
देशात घडतायत अनेक बदल :
या काळात आपला देश विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे. डिजिटल सेवांचा स्वीकार करून आपण अनेक गोष्टी सोयीस्कर बनवल्या आहेत. घर बसल्या आता कितीही दूर असलेल्या माणसाला पैसे पाठवता येतात, UPI च्या वाढत्या वापरामुळे हातात पैसे घेऊन जाण्याची गरज उरलेली नाही. देशातील अनेक बँका नेट बँकिंगच्या सुविधांचा वापर करायची परवानगी देतात. यामूळे आपला वेळ वाचतोच पण सोबतच देशाला विकास करण्यात सुद्धा भरपूर मदत होत आहे. त्यातच आता SBI कडून आणलेला हा नवीन डीव्हाईस डिजिटल इंडिया मोहिमेला मदत करणारा असेल नक्कीच.