बिझनेसनामा ऑनलाइन | सध्या सर्व ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने काम केले जाते. यामध्ये सरकारी ऑफिस मध्ये देखील ऑनलाइन पद्धतीने डॉक्युमेंट जमा करणे यासारखे अनेक काम होत असतात. त्याचबरोबर पैसे काढण्यासाठी आपण बँकेत न जाता एटीएम च्या माध्यमाने पैसे काढतो. आणि ट्रान्सफर करण्यासाठी आपण स्मार्टफोनच्या आधारे ट्रान्सफर करत असतो. आता खाजगी आणि सरकारी बँकांनी अजून काही सुविधा ऑनलाइन इंटरनेटच्या माध्यमातून देण्याचे ठरवले आहे. या सुविधांमध्ये आता तुम्ही घरी बसल्या बँक बॅलन्स चेक करू शकतात. त्याचबरोबर चेक बुक, पासबुक, एफडी, लोन, यासह सेविंग अकाउंट तयार करण्यासाठी देखील तुम्हाला बँकेत जाण्याची गरज राहणार नाही. हे सर्व काम तुम्ही आता घरी बसल्या करू शकणार आहेत.
आता देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SBI ने सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. जेणेकरून बँकेच्या ब्रांच मध्ये येण्यापेक्षा घरी बसूनच सर्व कामे होतील. त्यासाठी SBI ने खास इन्स्टा सेविंग अकाउंट ग्राहकांसाठी तयार केले आहे. जेणेकरून सेविंग अकाउंट च्या माध्यमातून SBI मध्ये अकाउंट ओपन करणे अत्यंत सोपे होईल. त्याचबरोबर हे अकाउंट ओपन करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज असणार नाही. घरबसल्या तुम्ही SBI मध्ये इन्स्टा सेविंग बँक अकाउंट ओपन करू शकतात.
SBI ने या बँक अकाउंट बद्दल माहिती देताना सांगितले की, इन्स्टा सेविंग बँक अकाउंट हे आधार बेस्ड इन्स्टंट डिजिटल सेविंग अकाउंट आहे. या अकाउंट च्या मदतीने ग्राहक बँकेच्या इंटरनेटेड बँकिंग आणि लाइफस्टाईल प्लॅटफॉर्म YONO च्या माध्यमातून अकाउंट ओपन करू शकतील. या इन्स्टा सेविंग अकाउंट द्वारे ग्राहकांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्राहक अकाउंट ची KYC पूर्ण झाल्यानंतर एक वर्षासाठी जवळच्या शाखेमध्ये जाऊ शकतात.
वय 18 वर्ष हवं –
SBI च्या इन्स्टा सेविंग अकाउंट मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. त्याचबरोबर शिकलेले मुलं-मुली यामध्ये अकाउंट ओपन करू शकतात. ज्या ग्राहकांचे बँक ऍक्टिव्ह आहे. आणि CIF देखील उपलब्ध आहे. असे ग्राहक या योजनेमध्ये अकाउंट ओपन करू शकणार नाही. तसेच SBIचे नवीन ग्राहक किंवा ज्यांच्याकडे CIF नाही असेच ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
अकाउंट ओपन करण्यासाठी ही प्रोसेस वापरा-
सर्वात अगोदर तुमच्या स्मार्टफोनमध्ये YONO ॲप डाऊनलोड करा.
त्यानंतर व्हिडिओ KYC च्या माध्यमातून तुमचे सेविंग अकाउंट ओपन करा.
हे अकाउंट ओपन करण्यासाठी तुमच्या ॲप मध्ये New To SBI या ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर सेविंग अकाउंट निवडा.
त्यानंतर ब्रांच विजिट या ऑप्शन वर क्लिक करा.
तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड डिटेल मागवण्यात येतील. ते डिटेल भरा.
हे सर्व डिटेल भरल्यानंतर व्हिडिओ कॉल करून शेड्युल टाईम वर रिझ्युम च्या माध्यमातून युनो ॲप वर लॉगिन करा.
त्यानंतर व्हिडिओ केवायसी प्रोसेस पूर्ण आल्यावर SBI चे कर्मचारी अकाउंट व्हेरिफाय झाल्यानंतर इन्स्टा प्लस सेविंग अकाउंट डेबिट ट्रांजेक्शन साठी सुरू करण्यात येईल.