बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ने (SBI) ग्राहकांना गोड धक्का देण्याची तयारी केली आहे. यानुसार आता SBI बँक देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये 300 नवीन शाखा उघडण्याचा विचार करत आहे. ग्राहकांच्या महत्वकांक्षा समजून घेऊन त्यांना गरजेनुसार सुविधा देण्याचा प्रयत्न SBI करत असते. त्यानुसार आता लवकरच वेगवेगळ्या भागांमध्ये नवीन शाखा ओपन करण्यात येतील.
जिथे जास्त गरज त्याठिकाणी नव्या शाखा काढणार –
पीटीआय ने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय बँकेच्या या नवीन शाखा याच आर्थिक वर्षात उघडल्या जाणार आहेत.या संदर्भात स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा यांनी सांगितलं की, बँकेच्या बिझनेस ला डिजिटल रूपात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासोबतच एसबीआय बँकेच्या ब्रांच संख्या वाढवण्यासाठी यावर्षी ३०० पेक्षा जास्त नवीन ब्रांच उघडण्यात येणार आहे. या ब्रांच सुरु करण्यापूर्वी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त ब्रांचची गरज आहे हे लक्षात घेतले जाईल. त्यानंतरच एसबीआय बँकेच्या ब्रांचसाठी जागा फिक्स करण्यात येईल. आतापर्यंत देशांमध्ये एसबीआयच्या 22,405 शाखा असून 235 शाखा या विदेशात आहेत.
स्टेट बँकेचे रिटेल बिजनेस आणि ऑपरेशन्स चे व्यवस्थापकीय संचालक अलोक कुमार चौधरी म्हणाले की, एसबीआय बँक ही स्वतःच्या रणनीती वर काम करते. आणि सध्या सुरू असलेल्या ब्रांच सोबतचे ऋणानुबंध दृढ करण्याचा प्रयत्न देखील करत आहे. यावेळी त्यांनी बँकेच्या निव्वळ व्याज मार्जिनबाबत सांगितलं. ते म्हणाले, निव्वळ व्याज मार्जिन हे सध्याच्या आर्थिक वर्षांमध्ये 3.5% टक्के इतकं राहण्याची शक्यता आहे. यासोबत आम्ही तो 3.47% इथपर्यंत ठेवू शकतो. बँकेच्या तिमाही निकाल बद्दल बोलायचं झालं तर जून महिन्याच्या तिमाही बँकेने 16,884 कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे. यासोबतच बँकेच्या एनपीएमध्ये मोठी घट देखील नोंदवण्यात आली. मागच्या वर्षी बँकेचा नफा हा 6068 कोटी रुपये होता.