SBI New FD Rates : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!! बँकेकडून नवे FD Rates जाहीर

SBI New FD Rates : बँका दरवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असतात, यामागचा उद्देश अधिकाधिक ग्राहकांना आपल्याजवळ आकर्षित करणे असाच असतो. देशात सर्वत्र शाखा असलेली परिचयाची बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) . या बँकेचा ग्राहकवर्ग फारच मोठा आहे, आणि या ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी आणि नवीन लोकांना जोडण्यासाठी अश्या नवीन योजना राबवणे त्यांच्यासाठी एकार्थाने भागच आहे, आता स्टेट बँक कडून नवीन फिक्स्ड डेपोझीट रेट जाहीर केला आहे. या नव्या दराचा ग्राहकांना नेमका काय फायदा होणार ते जाणून घेऊया.

स्टेट बँकने जाहीर केलाय नवीन FD रेट : (SBI New FD Rates)

फिक्स्ड डेपोझीटमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी बँकच्या खात्यात पैसे गुंतवणे, इथे मनाप्रमाणे मधेच रक्कम काढून घेता येत नाही. आता स्टेट बँकने नवीन फिक्स्ड डेपोझीट रेट (SBI New FD Rates) जाहीर केल्यामुळे ग्राहकांना गुंतवणुकीबाबत निर्णय घेणं सोपं होणार आहे. बँकेने 7 ते 45 दिवसांसाठी फिक्स्ड डेपोझीट रेट 3 टक्के ठरवला आहे, जो कि जेष्ठ नागरिकांसाठी 3.5 टक्के असा ठरतो. पुढे 46 ते 179 दिवसांसाठी सामान्य माणसांसाठी फिक्स्ड डेपोझीट रेट 4.5 टक्के असून हाच दर सवलतीच्या दरांमध्ये उपलब्ध असून 5 टक्के आहे.

इतर व्याजदर कसे आहेत?

जर का तुम्ही एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी स्टेट बँकसोबत गुंतवणूक करणार असाल तर 180 ते 210 दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य लोकांना 5.25 टक्के तसेच जेष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के असा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. जर का तुम्ही 2 तर 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी 6.8 टक्के तर जेष्ठ नागरिकांसाठी 7.3 टक्के व्याजदर ठरवला गेलाय. तर 2 ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, बँककडून सामान्य लोकांनां 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.

हीच बँक 3 ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गेलेल्या गुंतवणुकीवर सर्वसामान्यांना 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के व्याजदर देणार आहे. आणि शेवटी 5 ते 10 वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर बँक सामान्य लोकांसाठी 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्के व्याजदर देऊ करणार आहे.