SBI News: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI काही दिवसांपासून चर्चेत आहे. अगोदर बँकेच्या शेअर्सची किंमत झपाट्याने वाढली आणि त्यामुळे Market Capitalization मध्येही मोठी वाढ झाली होती. पण आता पुन्हा एकदा स्टेट बँक हेडलाईन्समध्ये पाहायला मिळते, मात्र याचं कारण वेगळं आहे. यावेळी स्टेट बँकला भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) तब्बल 2 कोटी रुपयांचा दंड ठोकला आहे.
सर्वोच्य बँकने का ठोठावला एवढा मोठा दंड? (SBI News)
भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर 2 कोटी रुपये दंड ठोठावला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार ही शिक्षा नियामनात्मक पालनाची कमतरता आढळल्यामुळे घेण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, SBI ने जमाकर्ता जागरूकता निधी योजना (Depositor Awareness Fund Scheme) 2014 च्या काही नियमांचे उल्लंघन केले, त्यामुळे बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
SBI ने काही कंपन्यांकडून कर्ज घेतले आणि त्या कर्जाच्या बदल्यात कंपन्यांच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स तारण म्हणून घेतले होते. परंतु, बँकिंग नियमन अधिनियमनुसार बँकेने तारण घेतलेल्या रकमेची परतफेड एका विशिष्ट वेळेत करणे आवश्यक होते. SBI ने वेळेत रक्कम जमा न केल्याने, RBI ने बँकेला नोटीस पाठवली होती.
या घटनेचा ग्राहकांवर परिणाम काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) स्पष्ट केले आहे की, ही शिक्षा दंड (penalty) भारतीय स्टेट बँकेवर (SBI) नियमावलींचे पालन करण्यात झालेल्या त्रुटींमुळे लावण्यात आली आहे. याचा ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराशी किंवा कराराशी काहीही संबंध नाही(SBI News). म्हणजेच, रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्यांना सर्व सेवा पूर्वीप्रमाणे मिळत राहतील.