SBI PPF Account : SBI ग्राहकांनो, PPF साठी बँकेत जाण्याची गरज नाही; घरबसल्या असं उघडा खातं

SBI PPF Account। आपल्या ग्राहकांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी बँका नवीन मार्ग आजमावून पाहतात. आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI देखील आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी सुविधा घेऊन आली आहे, यामुळे PPF चं खातं उघडण्यासाठी तुम्हाला बँकमध्ये जाण्याची गरज नाही. आता घरबसल्याच हे काम केलं जाऊ शकतं. आपण टेक्नोलोजीचा वापर करून वेळोवेळी आपली कामं सोपी करत असतो. कधीकाळी हातात पैसे घेऊन फिरणारे आपण आता मोबाईलच्या एका क्लिकवरून पैसे थेट परदेशात पाठवतो. त्याच पद्धतीने आता SBI ग्राहक बँकेत न जाताच आपलं PPF खाते काढू शकता. कसे ते आज आपण जाणून घेऊया.

कसं उघडाल घरबसल्या PPF खातं : SBI PPF Account

घरबसल्या SBI द्वारे PPF चं खातं उघडण्यासाठी सगळ्यात आधी बँकच्या इंटरनेट बँकिंगद्वारे लॉग इन करा.
एकदा का लॉग इन करून तुम्ही बँकच्या पेजवर गेलात कि Request and Inquiries हा पर्याय निवडा.
इथून पुढचा मार्ग म्हणजे नवीन खातं उघडण्याचा पर्याय निवडणे, त्यामुळे PPF New Account हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
हे पेज उघडल्यानंतर तुमची माहिती तिथे पाहायला मिळेल
आता तुम्हाला ज्या शाखेत PPF खातं उघडायचं असेल त्याचा कोड टाका.
हा फॉर्म साब्मिट करण्याआधी तुम्ही दिलेली माहिती तपासून पहा.
हा फॉर्म साब्मिट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिसेल ज्याचा वापर करून तुम्हाला तो फॉर्म डाऊनलोड करता येईल.
हा फॉर्म मिळाल्यानंतर त्यावर तुमचा फोटो व KYCची कागदपत्रे जोडून बँकमध्ये जमा करा.

या गोष्टी लक्षात ठेवा:

बचत खाते ऑनलाईन उघडण्यासाठी (SBI PPF Account) तुम्हाला KYC फारच महत्वाचा आहे. तुमच्याजवळ जर का KYC नसेल तर तो सर्वात आधी मिळवा. याशिवाय तुमचा आधार कार्ड नंबर बँकच्या बचत खात्याशी जोडलेला असला पाहिजे, तसेच मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असणे अनिवार्य आहे.आणि सगळ्यात शेवटी PF मध्ये तुम्हाला दरवर्षी किमान 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागते, हा आकडा तुमच्या इच्छेप्रमाणे जास्तीत जास्त 1,50,000 पर्यंत जाऊ शकतो.