SBI Shares: आजच्या बाजारात SBIच्या शेअर्सनी केली तुफानी कामगिरी; बँकेचे बाजरी भांडवल 6.75 लाख कोटी

SBI Shares: भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) शेअर्सनी आज दुपारच्या सत्रात रेकॉर्ड उच्चांक गाठला. BSE वर SBIच्या शेअरमध्ये 2.01 टक्के वाढ झाली आणि ते 758.70 इतके उच्चांवर गेले. या वाढीमुळे बँकेचे बाजार भांडवल वाढून 6.75 लाख कोटी इतके झाले आणि BSE वर एकूण 4.18 लाख शेअर्सची हाताळणी झाली, त्याची उलाढाल रु. 31.31 कोटींची होती.

SBI च्या शेअर्सनी केला विक्रमी पराक्रम: (SBI Share)

आजच्या तुफानी कामगिरीमुळे SBI चा शेअर रेकॉर्ड उच्चांवर पोहोचला आहे, आणि तो सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये(overbought zone) आहे. हे त्याच्या रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स (RSI) वरून दिसून येते, जो सध्या 76.2 आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर गेल्या काही दिवसांत या स्टॉकची किंमत झपाट्याने वाढली असल्याने आता यात थोडी सुधारणा होण्याची शक्यता बाळगली जाऊ शकते. शेअर बाजारात काही गोष्टी नक्की नसतात, पण SBI चा मजबूत पाया आणि कमी चढउतार हे गुंतवणूकदारांना थोडीशी शांतता देणारे आहेत असं म्हटलं जाऊ शकतं.

भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या SBI ची आगामी काळात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. Axis Securities च्या मते, FY24 ते FY26 या काळात बँकेचा “रिटर्न ऑन असेटस” (RoA) 1 टक्के आणि “रिटर्न ऑन इक्विटी” (RoE) 16 टक्के राहण्याची अपेक्षा आहे, याला बँकेची स्थिर कर्ज वसूली आणि कमी खर्च हे कारणीभूत असतील.

डिसेंबर 2023 च्या तिमाहीनुसार बँकेचा “कॅपिटल ॲडेक्वसी रेशिओ”(CAR) 14.68 टक्के होता. भारतात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना कमीत कमी 12 टक्क्यांचा CAR राखणं बंधनकारक आहे(SBI Shares). या पार्श्वभूमीवर, Motilal Oswal यांनी SBI च्या शेअर्सवर buy ची शिफारस केली आहे आणि त्यांचं लक्ष्य 860 रुपये आहे.