Schemes For Startup : आत्ताच्या घडीला बेरोजगारी प्रमाणेच सुशिक्षित बेरोजगारी ही देखील सर्वात मोठी समस्या बनली आहे. आपण देशातील तरुण हीच देशाची खरी ताकद असं म्हणतो, पण या तरुणांना त्यांच्या कुवातीप्रमाणे नोकऱ्या आणि रोजगाराची साधनं उपलब्ध न होत असल्याने देशात दिवसेंदिवस बेरोजगार तरुण आणि तरुणींचे संख्या वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीतही सकारात्मक म्हणावी अशी गोष्ट म्हणजे, हे तरुण खचून न जाता मेहनत करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न करतात. मात्र केवळ व्यवसाय उभा करावा म्हटलं म्हणून त्यातून भरभराट होत नसते. सुरुवातीला व्यवसायात गुंतवणूक करावी लागते आणि म्हणूनच इच्छा असूनही अनेक जणं पैशांच्या अभावी व्यवसायाची सुरुवात करू शकत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही विशेष योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा फायदा करून घेत तुम्ही नक्कीच एखादा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करू शकता.
1) क्रेडिट गॅरंटी स्कीम (CGSS): क्रेडिट गॅरंटी स्किम(Credit Guarantee Scheme) च्या माध्यमातून सरकार स्टार्टअप कंपन्यांना 10 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देतं. या योजनेअंतर्गत सरकारकडून नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या व व्यापारी बँका यांच्याकडून देण्यात येणाऱ्या कर्जावर गॅरंटी देण्यात येते व सोबतच तुम्हाला 10 कोटी रुपयांच्या कर्जावर हामी दिली जाते.
२) प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY): केंद्र सरकारकडून सुरू केलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक गॅरंटी स्कीम आहे. या योजनेअंतर्गत लघुउद्योजकांना व स्टार्टअपना 10 लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं. आरबीआय(RBI) किंवा इतर व्यापारी बँका तसेच MFI आणि NBSC यांच्याद्वारे तुम्ही हे कर्ज मिळवू शकता. या योजनेचा फायदा करून घेत 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळवता येतं.
३) स्टार्ट अप इंडिया योजना: ग्रामीण भागातील महिला आणि मागासवर्गीय उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरता स्टार्ट अप इंडिया(Startup India) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची खास बाब म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचे तारण न ठेवता तुम्ही 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकता, तसेच इथे व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुम्हाला पहिले तीन वर्ष आयकरामधून सूट दिली जाते(Schemes For Startup).
४) राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ योजना: ही योजना तंत्रज्ञान आणि फायनान्स व मार्केटिंग(Finance and Marketing) या क्षेत्रांना आधार देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. नमूद केलेल्या क्षेत्रांमध्ये जर का तुम्हाला विविध प्रकारचे स्टार्टअप किंवा लघुउद्योग सुरू करायचे असतील तर ही योजना तुम्हाला दोन प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्ध करून देईल :
A) विपणन सहाय्य योजना: बाजारात जर का तुम्हाला भक्कम स्थान निर्माण करायचे असेल किंवा व्यवसायात वाढ करायची असेल तर या योजनेचा फायदा करून घेता येतो. इथे तुमच्या व्यवसायाची जाहिरात होते व म्हणूनच अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत व्यवसाय पोहोचतो.
B) क्रेडिट सहाय्य योजना: नावाप्रमाणेच या योजनेअंतर्गत तुम्हाला व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी तसेच व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी लागणाऱ्या पैशांची मदत केली जाते.