Semiconductor: भारतात लवकरच येणार 2 अत्याधुनिक सेमीकंडक्टर कारखाने

Semiconductor: भारत सरकार येत्या काळात भारताला Semiconductor उत्पादनाचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी आपल्या सरकारकडून विविध देशांसोबत हजारो कोटी रुपयांच्या करारांना मान्यता देण्यात येत आहे. लवकरच भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून दोन पूर्ण विकसित Semiconductor संयंत्र उभारले जाणार आहेत. याशिवाय अनेक Chip Assembly आणि Packaging Units च्या स्थापनेसाठीही गुंतवणूक प्रस्तावित आहे. या दोन प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात 8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे इस्रायलची Tower Semiconductors कंपनी तर दुसरा प्रकल्प टाटा समूह राबवणार आहे.

भारतात Semiconductor चे दोन प्रकल्प:

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, भारतात लवकरच दोन अत्याधुनिक Semiconductor कारखाने उभारले जातील. हे कारखाने 65, 40 आणि 28 नॅनोमीटर तंत्रज्ञानाचा वापर करतील आणि अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूकीचे हे उत्तम साधन बनेल. याशिवाय, अनेक इतर प्रस्तावांचेही मूल्यांकन केले जात आहे. इस्त्रायलच्या Tower Semiconductor कंपनी ने भारतात 8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे अशी माहिती चंद्रशेखर यांनी माध्यमांना दिली.

टाटा समूहाची भूमिका महत्वाची का?

टाटा सन्स लवकरच Semiconductor Assembly आणि Testing चा व्यवसाय सुरू करणार आहे. टाटा समूहाने 2020 मध्ये इलेक्ट्रॉनिक घटकांच्या उत्पादनासाठी “Tata Electronics” नावाची कंपनी स्थापन केली होती. टाटा सूत्रांनुसार, कंपनी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे जमीन खरेदी करण्याच्या तयारीत आहे, ही जमीन अधिग्रहित झाल्यानंतर कंपनी पुढील कार्यवाही करेल(Semiconductor). टाटा समूहाची उपकंपनी Tata Electronics ने तामिळनाडू सरकारसोबत 4,684 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह फोन पार्ट्स निर्मिती युनिटसाठी करार केला आहे, ज्यामधून 18,000 हून अधिक लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.