Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे ‘ही’ योजना; FD पेक्षा मिळतोय जास्त रिटर्न

Senior Citizen Saving Scheme । आपण पैश्यांची गुंतवणूक का करतो? तर हाच पैसा म्हातारपणात कामी यावा म्हणून. कुणावर आपण अवलंबून राहू नये यासाठी पैसे कमवत असताना काही गुंतवणुका केल्या जातात. एका काम करणाऱ्या माणसाला जेवढा पैसा महत्वाचा आणि गरजेचा आहे तेवढाच तो रिटायर माणसासाठी देखील आहे. आता रिटायर माणसांनी कशी व कुठे गुंतवणूक करावी? तर अश्या ठिकाणी जिथून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि सोबतच गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतील. जास्तीत जास्त वेळा वृद्धांजवळ पैसे कमावण्याचं साधन असत नाही त्यामुळे नेमकी कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक पर्याय सुचवणार आहोत जो नक्कीच तुमची मद्त करेल.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना – Senior Citizen Saving Scheme:

ज्येष्ठ नागरिक बचत योजना हि योजना सरकारकडून वृध्द लोकांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेत मिळणाऱ्या व्याजदराचा आकडाही कमालीचा आहे. योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 8.2 टक्के व्याजदर दिला जातो. कोणतीही व्यक्ती जिचं वय 60 वर्षांपेक्षा जास्ती आहे अशी व्यक्ती या योजनेचा भाग बनू शकते. शिवाय ज्याचं वय 55 ते 60च्या आसपास आहे आणि ज्यांनी व्हीआरएस घेऊन निवृत्ती स्वीकारली आहे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

या योजनेत किती पैसे गुंतवू शकता?

या योजनेत गुंतवणूक (Senior Citizen Saving Scheme) करण्यासाठी 1 लाख रुपयांपासून सुरुवात करता येते. शिवाय तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. काही वर्षांपूर्वी या योजनेची मुदत 15 लाख रुपयांपर्यंत होती जी वाढवून आता 30 लाख करण्यात आली आहे. योजनेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो, पाच वर्षानंतर हि रक्कम मेच्युअर होते व तुम्ही ती काढून घेऊ शकता. इथे सिनिअर सिटीजनसाठी टॅक्स वर सवलत दिली जाते आणि यावर मिळणारा व्याज हा जमा रकमेच्या तिमाईवर अवलंबून असतो. या योजनेत जर का तुम्ही 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केलीत तर त्यावर तुम्हाला 1,41,000 रुपये एवढा मोठा रिटर्न मिळेल तर 15,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 21,15,000 रुपये मिळतील.